Ajit Pawar | अजित पवारांवर ‘या’ युवा नेत्याचा हल्लाबोल, ”सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते”

शिर्डी : Ajit Pawar | दबावापोटी पवार साहेबांना आमदार सोडून गेले, ते प्रेमापोटी कोणी गेले नाही. जर तुम्ही सत्तेच्या बाहेर असता तर तुमच्या सोबत ५ देखील आमदार आले नसते. पण तुम्ही सत्तेबरोबर आहात, ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत. आज इथे जे कार्यकर्ते थांबलेले आहेत ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) विचारांनी थांबलेले आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (NCP Mahebub Shaikh) यांनी केला. (Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे शरद पवार यांच्या नेतृत्वात सुरू आहे. या शिबिरात मेहबुब शेख बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५४ आमदार निवडून आले ते फक्त शरद पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून निवडून आले.

अजित पवारांवर टीका करताना महेबूब शेख म्हणाले, आता काही लोक सांगतात की, साहेबांनी ३८ व्या वर्षी निर्णय घेतला, आम्ही ६० व्या वर्षी निर्णय घेतला. यांनी जर ३८ व्या वर्षी निर्णय घेतला असता तर सरपंच तरी त्यांच्याबरोबर आला असता का? शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळी परिस्थिती तशी होती. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिंमतीवर ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री असायला शरद पवार व्हावे लागते.

महेबूब शेख म्हणाले, नकली फुले केसात माळून शरीरात वसंत येत नसतो, पांढरे केस काळे केले म्हणून कोणी तरुण
होत नसतो आणि पक्षावर दावा केला म्हणून कोणी शरद पवार होत नसतो. (Ajit Pawar)

महेबूब शेख म्हणाले, जर शरद पवार व्हायचे असेल तर सत्ता गेली तरी बेहत्तर, ज्या महामानवाने देशाचे संविधान लिहिले
त्या महामानवाचे नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देईल हा निर्णय घ्यावा लागतो, तुम्हाला जर शरद पवार व्हायचे
असेल तर मंडळ आयोगाच्या विरोधात निघालेली कमंडल यात्रा निघालेली असताना देखील मंडल आयोगाची
अंमलबजावणी करून २७ टक्के ओबीसी समाजाला आरक्षण (OBC Reservation) देण्याचे काम तुम्हाला करावे लागते.

युवकांना आवाहन करताना महेबूब शेख म्हणाले, वेळ कमी आहे.
सर्वांना पुढचे नऊ महिने प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर जाऊन सकाळपासून रात्रीपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
प्रत्येक गावागावांमध्ये शाखा तयार करायच्या आहे. शरद पवार साहेबांचे काम कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

लंडन ते मुंबई प्रवासात 152 ग्रॅम सोने गायब, पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल