Ajit Pawar – Mohit Kamboj | मुख्यमंत्रीपदावरुन अजित पवारांना खोचक टोला मोहित कंबोज यांना भोवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar – Mohit Kamboj | भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन पुन्हा वाद जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं होतं. मात्र काही वेळाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तंबी दिली तसेच त्यांचे कान टोचल्यानंतर मोहित कंबोज यांनी हे ट्विट डिलीट केले. बुधवारी सकाळी लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवार यांच्या कर्यकर्त्यानं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत चिठ्ठी अर्पण केली होती. त्यानंतर हा वाद सुरु झाला होता. (Ajit Pawar – Mohit Kamboj)

मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजित पवार यांना डिवचले. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक कार्य़कर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. मुख्यमंत्री होण्यासाठी 145 चा आकडा लागतो, हे सर्वांना माहिती आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे पुढे म्हणाले, याआधीही अनेकवेळा अजित पवार मुख्यमंत्री होणार,
अशी विधानं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट वक्तव्य केलं होतं. 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढच्या विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांच्यासोबतही स्पष्टपणे ही चर्चा झाली होती, असंही फडणवीस म्हणाले होते. (Ajit Pawar – Mohit Kamboj)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा ! 40 दिवसांचा वेळ दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय…

Maharashtra MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, म्हणाले – ‘नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा’

Nitesh Rane On Vijay Wadettiwar | ‘विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील’ – भाजप आमदार

Pune Ring Road | पुणे : रिंगरोडसाठी 14 गावांतील भूसंपादन पूर्ण