Ajit Pawar | ‘मागे टेकावडेंकडे IT ची रेड पडली होती’, अशोक टेकावडेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांनी व्यक्त केला संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) यांनी भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टेकवडे यांच्या भाजप प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. टेकवडेंवर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड (Income Tax Department Raid) पडली होती. त्यामुळे हे असं घडलंय असं ऐकायला मिळत आहे, असा संशय अजित पवारांनी (Ajit Pawar) व्यक्त केला.

सुप्रिया सुळेंना फटका बसणार?

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरमधील मतं महत्त्वाची ठरतात. गेल्या लोकसभा निवडणुकीतही पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतं सुप्रिया सुळेंसाठी (MP Supriya Sule) महत्त्वाची ठरली होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्याच एका महत्त्वाच्या नेतानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुरंदर राष्ट्रवादीमध्ये (Purandar NCP) मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सुप्रिया सुळेंना तालुक्यातील मतांची जमवाजमव करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, अशी चर्चा आहे.

त्या कार्यकर्त्याला मीच तयार केलं

अशोक टेकवडे अजित पवारांच्या (Ajit Pawar) जवळचे नेते मानले जातात. मात्र, त्यांच्याच भाजप प्रवेशामुळे राजकीय चर्चांनी उधाण आलं आहे. त्या कार्यकर्त्याला मीच तयार केला होता. त्याला मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Pune District Central Bank) संचालक केलं होतं. त्यानंतर आमदारकीचे तिकीट दिलं. निवडून आणलं. त्यांनी कामही केली. नंतरच्या काळात तिथे आमच्या स्थानिक पक्षांतर्गत काही लोकांशी त्यांचं जमत नव्हतं. मी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मनाचा पक्का निश्चय केला असेल. आम्ही प्रयत्न केला. पण ते म्हणाले की मी आणि माझ्या मुलाने निर्णय घेतला आहे. त्यांचे वडीलही शरद पवारांचे (Sharad Pawar) कट्टर कार्यकर्ते होते, असे अजित पवार यांनी सांगितले.

IT ची धाड पडली तेव्हा…

अजित पवार पुढे म्हणाले, मी अशोक टेकवडेंना नेहमीच जवळ केलं. माझ्या परीनं पक्षाच्या माध्यमातून ताकद
देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक वादातून दुर्दैवानं आम्हाला मार्ग काढता आला नाही. म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली.
त्याला इतरही काही कारणं आहेत. ती कारणं तुम्ही त्यांनाच विचारलीतर बरं होईल.
कारण मध्यंतरी त्यांच्याकडे आयटी विभागाची धाड पडली. तेव्हा काही कागदपत्रे तिथं मिळाली असं माझ्या
कानावर आलं. त्यामुळे ते असं घडलंय असं ऐकायला मिळतंय, असा संशय अजित पवार यांनी व्यक्त केला.

Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar slams ashok tekawade joining bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकवासल्यातून बचावलेल्या सात वर्षांच्या कुमुदला पडली ऑक्सिजनची गरज

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)