Ajit Pawar | अजित पवारांच्या लिफ्टला अपघात, स्वत: दिली माहिती; म्हणाले – ‘सुदैवाने वाचलो नाहीतर आजच…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या लिफ्टला शनिवारी (दि.14) अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघताची माहिती स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ही घटना पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी अपघाताची माहिती दिली.

 

सुदैवाने आम्ही वाचलो नाहितर…
शनिवारी एका रुग्णालयात अजित पवार (Ajit Pawar) गेले होते. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर लिफ्टने (Lift) जात असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली आली. सुदैवाने आम्ही वाचलो नाहीतर आजच श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, असे अजित पवार यांनी सांगितले. शनिवारी दिवसभर मी हे कोणालाच सांगितले नाही. मात्र, आज तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, असेही अजित पवार म्हणाले.

 

नेमकं काय झालं?
अजित पवार यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले, शनिवारी दिवसभरात मी दोन हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर चौथ्या मजल्यावर जात होतो. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तेथून लिफ्ट थेट खाली आली. त्यावेळी माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक होते. यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळं घरात कोणाला काही सांगितलं नाही. माध्यमांना देखील याची माहिती होऊ दिली नाही. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आशीर्वादामुळे मला काही झालं नाही. या अपघातानंतर काही न झाल्या सारखं दाखवून मी भाषण करुन घरी आलो, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar elevator accident in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड

Sonalee Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काळ्या रंगातील साडीत दिसत आहे एकदम कडक