Ajit Pawar | पुणेकरांसाठी खुशखबर ! अजित पवारांकडून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (शुक्रवार) पुणेकरांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने पुण्यात दिवाळी पहाट (pune diwali pahat) कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशी मागणी पुणेकरांनी केली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांची ही मागणी मान्य करुन पुण्यातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. शुक्रवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच राज्यातील थिएटर्स (Theaters), नाट्यगृहे ही सुरु करण्यात आली असून ती 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा अंदाज घेऊन कोरोना वाढला नाही तर दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा विचार असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

आठवडे बाजाराबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी सांगितले की याबाबत जिल्हाधिकारी (Collector) यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहर (Pune city) आणि ग्रामीण (Pune Rural) भागातील आठवडे बाजार उद्यापासून सुरु होतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या (Insurance companies) शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नसल्याचे अजित पवारांनी सांगितले.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दिराकडून 42 वर्षीय भावजयीला ‘अनैतिक’ संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; वारजे माळवाडीमध्ये विनयभंगाचा FIR

Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

Pune Crime | पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेसोबत जबरदस्तीने शरीर ‘संबंध’, ‘लगट’ केलेल्याचे व्हिडीओ FB व्दारे पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | ncp leader ajit pawar permission granted for diwali pahat programme in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update