Ajit Pawar | ‘बस झालं… आता मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अजित पवारांचं आक्रमक भाषण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन आज मुंबईत करण्यात आलं होतं. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच यावेळी मला विरोधी पक्षनेतेपद (Opposition Leader) कधीच नको होतं. मला या जबाबदारीतून (Maharashtra Politics News) मुक्त करा आणि पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यात कुठलाही रस नव्हता. मात्र आमदारांनी आग्रह केला, सह्यांची मोहीम राबवली. त्यामुळे वरिष्ठ म्हणाले की तू तयार हो, त्यामुळे मी विरोधीपक्ष नेतेपद स्वीकारले. आता एक वर्ष मी हे पद सांभाळलं आहे. पण आता बास झालं, मला आता विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा मग बघा कशा पद्धतीने पक्ष चालतो ते. पण हे सर्व वरिष्ठांवर अवलंबून असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते मंडळी स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्ता आणत असतात. राष्ट्रवादीला ते का शक्य होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी मी स्वत: जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या कामाचा मला अनुभव आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी ऐनवेळी अनेकांना आमदारकीची उमेदवारी दिली, ते सर्वजण निवडून आले.
आता मला संघटनेत कोणतेही पद द्या. तुम्हाला जे योग्य वाटेल ते पद द्या.
त्या पदाला न्याय कसा देतात हे दाखवून देईन, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांची ही मागणी म्हणजे ते आता अप्रत्यक्षरित्या नाहीतर थेट संघटनेची सुत्रे
आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
आगामी निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजित पवार पुढे येत नाहीत ना, अशी देशील चर्चा रंगू लागली आहे.

 

 

 

Web Title :  Ajit Pawar | Now release me from the responsibility of the leader of the opposition’, Ajit Pawar’s aggressive speech

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा