Ajit Pawar On Devendra Fadnavis | सहा-सहा जिल्हे, कसं पेलवणार…तरीही शुभेच्छा, अजित पवारांचा पालकमंत्री पदावरून फडणवीसांना खोचक टोला

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Devendra Fadnavis | विरोधकांनी सातत्याने टीका केल्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची (Guardian Minister) नियुक्ती केली आहे. पण काही मंत्र्याकडे दोन-दोन जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमच केला असून त्यांच्याकडे तब्बल 6 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आल्याने विरोधक सध्या टीका करत आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना फडणवीस (Ajit Pawar On Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

 

बारामती सहकारी बँकेच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत.

 

माझ्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते, तर माझ्या नाकीनऊ येत होते.
आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता.
त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे,
हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा, असे पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar On Devendra Fadnavis | ncp leader ajit pawar on deputy cm devendra fadnavis on 6 districts guardian minister baramati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

S. Jaishankar | युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक

Ashish Shelar | भाजपाच्या शेलारांचा शिवसेनेला सवाल, पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?

Ajit Pawar | 6 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा, अजित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका, मोदींवरही नाव न घेता साधला निशाणा, म्हणाले…