पवार कुटुंब लोकसभेच्या ४ जागा लढवणार ? अजित पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पवार कुटुंब ४ लोकसभा मतदारसंघात आपल्या घरातील उमेदवार देणार या चर्चेला प्रसार माध्यमात आणि सोशल माध्यमात उधाण आले आहे. अशातच या विषयावर राष्ट्रवादीचे विधी मंडळ नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवार कुटूंबातील ४ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत या चर्चेला काहीच तथ्य नाही असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या आजच्या वक्तव्यामुळे चार ठिकाणाहून पवार कुटुंब लोकसभा लढवणार या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पुत्र पार्थ पवार, बारामतीतून शरद कन्या सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अजित पवार आणि माढा लोकसभा मतदारसंघातून खुद्द शरद पवार अशी हि चर्चा मागच्या काही दिवसात भरात आली होती. त्या चर्चेवर स्वतः अजित पवार यांनी पडदा टाकला आहे.

मी बारामती मतदारसंघात जातो म्हणजे मी बारामती मतदारसंघातून लोकसभा लढणार आहे असे होत नाही. त्यामुळे पार्थने मावळ मध्ये जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला म्हणजे तो तेथून निवडणूक लढणार असा अर्थ होत नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.  जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आम्ही सर्व महाराष्ट्रात फिरतो. आमच्या दौऱ्याचा उद्देश हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा असतो याचा अर्थ हा होत नाही कि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवार म्हणून उभा राहणार आहे असे अजित पवार म्हणाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us