अक्कलकोट : जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी !

अक्कलकोट – अतिवृष्टी आणि पुरामुळे अक्कलकोटचा पशुपालक शेतकरी उध्वस्त झाला असून आठ महिन्या पासून जनावरांचा बाजार बंद होता.तो तातडीने सुरू करण्याचे निवेदन अक्कलकोट बाजार समिती सचिव मडोळप्पा बद्दोले यांना देण्यात आले.

राज्याचे मुख्य सचिव संजीवकुमार यांनी अनलॉकडाऊन १५ अंतर्गत जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप अक्कलकोटचा जनावरांचा बाजार समिती बंद असल्याने आज मोठ्या संख्येने पशुपालक आले होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वामींनाथ हरवाळकर यांनी त्यांचे व्यवहार पूर्ण होईपर्यंत त्यांना सहकार्य केले.येत्या सोमवार दि,२६ पासून नियमित परवानगी घेऊन जनावरांचा आठवडी बाजार सुरू करीत असल्याचे बद्दोले यांनी सांगितले.निवेदन सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने देण्यात आले.निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

या वेळी सुभाष शिंदे,राजू नदाफ, इसाक शेख,परमेश्वर मिनगले,शंरनू शिवगुंडे,शिवू देवरमनी,गुलाब पटेल आदि पशुपालक शेतकरी मोठया बसंख्येने उपस्थित होते.निवेदन घेताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कर्मचारी नूर शेरीकर, गौरीशंकर माजगे आदीजण उपस्थित होते.