फेसबुकवरील मैत्रिणीचा सल्ला ऐकून महिलेनं सोडलं पती आणि मुलाला

अकोला  : पोलीसनामा ऑनलाईन  –   लॉकडाऊनमुळे अनेकांची चीडचीड होत आहे. एवढंच नाही तर पती-पत्नी यांच्यातील भांडण विकोपालाही जात आहे. यातच एक घटना घडली आहे ती म्हणजे, एका महिलेनं फेसबुकवरील मैत्रिणीचा सल्ला ऐकून पती आणि मुलाला सोडलं आहे. हि घटना घडलीय अकोला येथे. या घटनेनं अनेकांना धक्का बसलाय.

कोरोनामुळे देशात मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे वैवाहित दांम्पत्यांमध्ये भांडण आणि खटके उडत आहेत. यामुळे काहीजण टोकाच्या निर्णयापर्यंतही पोहचत आहेत. सर्व कामकाज ठप्प झाल्याने ताणतणाव देखील वाढत आहे. तसेच अकोला इथल्या एका महिलेच्या घरात देखील झालं. लॉकडाऊनमुळे या महिलेच्या घरी सतत वाद होत होते. ताण तणाव वाढल्यामुळे पती आणि मुलांसोबत राहण्यात चीडचीड होऊ लागली.

घरात वाढणार्‍या कौटुंबिक वादविवादमुळे या महिलेला फेसबुकवर अधिक वेळ घालवू लागली. यातून तिला फेसबुक हाच आधार वाटला यावेळी तिची फेसबुकवर एक तरुणीशी ओळख झाली. या तरुणीसोबत हळूहळू बोलणे वाढले. फेसबुकवरील मैत्रिणीचा सल्ला त्या महिलेला आधार वाटू लागला. दोघींमधलं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होऊ लागलं. यात हि महिला घरातल्या समस्या, वैवाहिक जीवनातील वाद, सुख दु:ख एकमेकींना सांगू लागली. यावेळी या महिलेला फेसबुकवरील मैत्रिणीचा सल्ला पटू लागला.

यावेळी या महिलेनं फेसबुकवरील मैत्रिणीनं दिलेला सल्ला ऐकून पती आणि दोन वर्षाच्या मुलीला सोडून माहेरी गेली. माहेरीच्या लोकांना हि महिला/मुलगी घरी आल्याचे पाहून धक्का बसला. माहेरच्या लोकांनी तिला अनेक प्रकारे समजून सांगितले. मात्र, तिचा फेसबुकवरील मैत्रिणीऐवजी कोणावर विश्वास बसेना, अशी स्थिती होती. त्यामुळे माहेरच्या लोकांनी थेट पोलीस ठाणे गाठलं. यावेळी माहेरच्या लोकांनी महिलेचा घडलेला प्रकार पोलिसांनी सांगितला. यावेळी भरोसा सेलनं या महिलेला आश्रय देऊन तिचं समुपदेशन केले आहे. अकोला पोलिसांनी या महिलेला एका वसतिगृहात आश्रय दिलाय.