अलाया फर्निचरवालानं घातला 5 लाखांचा ‘ट्रान्सपरंट’ शिफॉन ड्रेस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जवानी जानेमन सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी अलाया फर्निचरवाला केवळ आपल्या सिनेमांमुळेच नाही तर आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळेही चर्चेत असते. मुंबईत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या एका अवॉर्ड शोमध्ये अलाया लेबल मार्चेसा (Marchesa)च्या एका ड्रेसमध्ये दिसली. या इव्हेंटमध्ये तिनं असिमेट्रीक एम्ब्रॉयडरीवाला ट्रान्सपरंट शिफॉन ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या ड्रेसवर एम्ब्रॉयडरी फ्लोरल वर्क करण्यात आलं होतं. तिच्या क्लासी गाऊन व्ही नेक स्टाईलनं बोल्ड टच दिला होता. तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत होतं.

अलायाच्या या ड्रेसची किंमत तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. तिच्या ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर तुम्हीही अवाक् व्हाल. अलायानं जो ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे त्याची किंमत 6995 डॉलर म्हणजेच 500625 रुपये एवढी आहे. या ड्रेससोबत तिनं सिल्वर स्ट्रॅप्ड हीलही घातले होते.

अलायाच्या हेअर स्टाईल बद्दल बोलायचं झालं तर तिनं पोनीटेल केली होती. तिच्या मेकअपबद्दल बोलायचं झालं तर तिनं ग्लॉसी पिंक लिपस्टिक, शिमरी ब्लश पिंक आयशॅडो आणि कोल आय मेकअप करत आपला लुक कम्प्लीट केला होता.
 alaya furniturewalla