Alert ! स्मार्टफोन युजर्संनी वॉलपेपर म्हणून चुकूनही ठेऊ नये ‘हा’ फोटा, क्रॅश होईल मोबाइल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही स्मार्टफोन यूजर आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खुप जरूरी आहे. हा तुमच्यासाठी अलर्ट आहे. तुमचा स्मार्टफोन खराब होऊ द्यायचा नसेल तर खाली दिलेली इमेज डाऊनलोड करून चुकूनही वॉलपेपर म्हणून सेट करू नका, अन्यथा तुमचा फोन क्रॅश होऊ शकतो. एवढेच नव्हे, तुमच्या फोनमध्ये बूटची समस्यासुद्धा निर्माण होऊ शकते. पॉप्युलर लीक्सटर युनिव्हर्सल आइजने ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली आहे. याशिवाय अनेक युजर्सनेही कन्फर्म केले आहे.

विशेषत: सॅमसंग युजरने हे लक्षात ठेवावे
युनिव्हर्सल आइजने फोटो-व्हिडिओ शेयर करून ट्विट केले आहे की, वॉर्निंग! हा फोटो कधीही वॉलपेपर म्हणून सेट करू नका. खासकरून सॅमसंग स्मार्टफोन वापरणार्‍यांनी हे लक्षात ठेवावे. यामुळे तुमचा फोन क्रॅश होऊ शकतो. हे अजिबात ट्राय करू नका. जर तुम्हाला कुणी असा फोटा पाठवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.

वॉलपेपर लावताच फोनमध्ये होत आहे बदल
युनिव्हर्सल आइजने आपल्या टेस्ट एक्सप्रिएन्सने सांगितले की, ही समस्या सॅमसंगच्या फोनमध्ये आहे. याची टेस्ट सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट 8 वर घेण्यात आली. यावेळी हा वॉलपेपर ठेवताच फोनचा कलर बदलला. परंतु, जेव्हा फोटो ट्विट केला तेव्हा त्याचा कलर बदलला नाही. एका युजरने आपला अनुभव सांगताना म्हटले की, हा फोटो डाऊनलोड करून वॉलपेपर म्हणून ठेवताच फोन क्रॅश झाला. युजरने स्पष्ट लिहिले आहे की, हे खरं आहे आणि तुम्ही ट्राय करू नका.

या फोटोत असे काही आहे ज्यामुळे होतेय समस्या
एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हा फोटो काही स्पेसिफिक कोडने एमबेडेड आहे, ज्यामुळे फोनमध्ये समस्या येत आहे. हा फोटो हेक्स एडिटर मध्ये उघडल्यानंतर यामध्ये गुगल इन्क डॉट 2016 आणि गुगल स्किया नावाचा मेटा डेटा दिसून आला. गुगल अजूनही या चित्रामुळे होत असलेल्या समस्येवर उपाय शोधत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like