निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीचा ‘धसका’, सोडलं ‘अन्न-पाणी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामुहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सुरु झाल्याने त्यांचे धाबे दणाणले असून चारही दोषींनी खाणे पिणे सोडून दिले आहे.

तुरुंग प्रशासनाकडून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, प्रॉपर्टी तसेच इतर गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे. मात्र फाशीच्या भीतीने ते काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या चौघांपैकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडले आहे. पवनचेही खाणे पिणे कमी झाल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्या तुलनेत मुकेश व अक्षय या दोघांच्या वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही.

चारही दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फासावर लटविले जाणार आहे. त्यांच्यासमोरील सर्व कायदेशीर वाटा बंद झाल्याने आता फाशी नक्की होणार असल्याने भीतीमुळे चौघांनी बोलणे जवळपास सोडले असून खाणेही जवळपास सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –