राज ठाकरेंना भेटण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या शिष्टमंडळाची कृष्णकुंजवर धाव, मनसे अध्यक्षांनी कॉल केला अन्…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे टोल नाका बंद करावा, या मागणीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जनविकास समिती आदी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 17) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. सोमाटणे टोलनाका बंद करावा, अशी तळेगावमधील नागरिकांची मागणी आहे. फक्त दीड किमी अंतरावर 2 टोलनाके असल्याने कायद्याला हरताळ फासून टोलनाक्या आडून नागरिकांची लूट सुरु असल्याचे शिष्टमंडळाने ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

शिष्टमंडळानी दिलेल्या माहितीनंतर, राज ठाकरे यांनी तातडीने IRB Infrastructure चे विरेंद्र म्हैसकरांना फोन केला. त्यानंतर ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील या विषयावर बोलतो असे सांगितले. त्यानंतर विरेंद्र म्हैसकर यांनी देखील यावर लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांना दिले. टोलनाक्याप्रश्नी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतल्याची माहिती जनविकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अचुट यांनी दिली.