Lakshmi Vilas Bank Crisis : अचानक असे काय झाले की, बुडण्याच्या स्थितीत आली लक्ष्मी विलास बँक; जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने प्रायव्हेट सेक्टरच्या लक्ष्मी विलास बँकेवर बुधवारी अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले. या प्रतिबंधांमुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत. आता खातेधारक आपल्या खात्यातून केवळ 25 हजार रुपये काढू शकतात. आरबीआयने सांगितले की, बँकेची स्थिती मागील 3 वर्षांपासून खराब आहे. यादरम्यान बँकेला लागोपाठ तोटा झाला आहे. बँकेला 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत 396.99 कोटी रुपयांचा शुद्ध तोटा झाला होता, तर तिचे ग्रोस एनपीए प्रमाण 24.45 टक्के होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बँक मोठ्या कालावधीपासून भांडवली संकटाचा सामना करत होती. यासाठी चांगल्या गुंतवणूकदारांचा शोध घेतला जात होता. आकड्यांनुसार, जून तिमाहीत बँककडे एकूण जमा भांडवल 21,161 कोटी रुपये होते. या स्थितीनंतर आरबीआयने नुकतीच या बँकेची जबाबदारी आपल्या हातात घेतली. बँकेच्या संचालनासाठी आरबीआयने तीन सदस्यीय कमिटी स्थापन केली होती.

आरबीआयने बनवला मर्जरचा प्लॅन

तर मागच्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत बँकेला 357.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आरबीआयने डीबीएस बँक इंडियासोबत लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाचा प्लॅन केला आहे. याचे लक्ष्य प्रतिबंध कालावधी समाप्त होण्यापूर्वी तिचे विलिनीकरण करण्याचे आहे. अशाच प्रकारची स्थिती मागच्या सप्टेंबरमध्ये पीएमसी बँक आणि यावर्षी मार्चमध्ये येस बँकेत समोर आली होती.

लोन बुकमध्ये अंतर

क्लिक्स कॅपिटलला देण्यात आलेल्या लोनमध्ये क्लिक्स कॅपिटलने आपल्या लोन बुकचे मूल्य 4200 कोटी रुपये ठेवले होते, तर एलव्हीबीने ते 1,200 रुपयांनी 1,300 कोटी रुपयांचे लिहिले, ज्यामुळे 2,500 ते 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तची मिसमॅचिंग दिसून आली, ज्यानंतर बँकेत आरबीआयद्वारे नियुक्त संचालक शक्ती सिन्हा यांनी म्हटले की, आम्ही मोठी गॅप पूर्ण करू शकत नव्हतो.

बँकेने अगोदर इंडिया बुल्ससोबत विलिनीकरणाचा प्रयत्न केला होता, ज्यास आरबीआयने परवानगी दिली नाही. बँकेची एनबीएफसीसोबत अनौपचारिक चर्चासुद्धा झाली, परंतु यश आले नाही.

94 वर्षे जुनी बँक

एलव्हीएस बँकेची स्थापना 1926 मध्ये झाली होती. देशभरात बँकेच्या 16 राज्यांमध्ये 566 शाखा आणि 918 एटीएम सुरू आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना विश्वास दिला होता की, सध्याच्या संकटाचा त्यांच्या पैशावर परिणाम होणार नाही. बँकेने म्हटले होते की, 262 टक्केच्या एलसीआरसह बचतधारक, बाँडधारक, खातेधारक आणि कर्जदारांची संपत्ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

केव्हा सुरू झाले संकट

एलव्हीबीची सध्याची समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा तिने रॅनबॅक्सी आणि फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर्स मालविंदर सिंह आणि शिविंदर सिंह यांच्या सुमारे 720 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर लक्ष दिले. 2016-17 च्या सुरुवातीला रेलिगेयर फिनवेस्टद्वारे बँकेला 794 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. रेलिगेयरने नंतर लोन वसुली करण्यासाठी एफडीचे पैसे वसूल केल्यानंतर एलव्हीबीच्या दिल्ली शाखेवर खटला दाखल करण्यात आला होता आणि हे प्रकरण न्यायालयात आहे.

केअर रेटिंग्सने ऑक्टोबरमध्ये घटवले होते क्रेडिट रेटिंग

क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्जच्या मागच्या महिन्यात 93 वर्षे जुन्या या प्रायव्हेट बँकेचे रेटिंग कमी केले होते. लक्ष्मी विलास बँकेने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितले होते की, केअरने त्यांचे 50.50 कोटी रुपयांचे अनसिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल सब-ऑर्डिनेटेड लोअर टीयर-2 बॉन्ड्सची रेटिंग घटवून बीबी मायनस केली आहे. आता केंद्र सरकारकडून बँकेला मोरेटोरियममध्ये टाकण्यासह अनेक प्रकारचे प्रतिबंध लागू झाले आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने येस बँक आणि पीएमसी बँकेवरसुद्धा असे प्रतिबंध लावले होते.