‘या’ 4 प्रकारच्या लोकांनी खाऊ नयेत ‘बदाम’, जाणून घ्या बदामाचे ‘फायदे-तोटे’ आणि एका दिवसात किती बदाम खावेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर आपण निरोगी आहार घेतला तर आपले आरोग्य देखील चांगले राहते. आज बदलत्या जीवनशैलीमुळे लोक मधुमेह (Diabetes), हृदयविकार, स्ट्रोक, थायरॉईड आणि लठ्ठपणा (Obesity) मुळे त्रस्त आहेत. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण कितीही व्यस्त असलात तरी आपल्या आहाराची पूर्ण काळजी घेणे महत्वाचे आहे. हे तेव्हा जास्त गरजेचे असते जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी (Lose Weight Fast) वेगवेगळ्या उपायांचा शोध घेत असता, मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे (Control Blood Sugar Level) उपाय जाणून घेत असता किंवा इतर आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करत असतात.

चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यासाठी लोकांना बर्‍याचदा ड्राय फ्रुट्स (Dry Fruits) खाण्याचा सल्ला दिला जातो. आणि जेव्हा ड्राय फ्रुट्सची चर्चा होते तेव्हा बदामाचा उल्लेख हा होतोच. बदामाला ड्राय फ्रुट्सचा राजा मानले जाते. परंतु तुम्हाला हे माहिती असावे की बदाम प्रत्येकासाठी स्वस्थ नसतो. काही अशीही प्रकरणे असतात ज्यात बदाम न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण या प्रकरणांमध्ये बदामाचे फायदे होण्याऐवजी त्याच्यापासून नुकसानच (Side Effects Of Almonds) अधिक होते. त्यामुळे आज आपण बदामाचे फायदे आणि तोटे याबद्दल जाणून घेऊ.

बदाम खाण्याचे फायदे (Powerful Health Benefits of Almonds)

1. वजन कमी करण्यात होते मदत (Lose Weight Fast)
बदाम वजन कमी करण्यास देखील मदत करू शकतात, परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण हे नियंत्रित प्रमाणातच खावे. खरं तर बदाम आपल्याला ओव्हर इटिंगपासून वाचवतात. जर तुम्ही बदाम खाल्ले तर तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. कारण बदामामध्ये फायबर, प्रथिने आणि हेल्दी फॅट असतात.

2. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त (Control Diabetes)
बदामामध्ये मॅग्नेशियम असते जे खूप फायदेशीर आहे. हे मधुमेह रूग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugsar Level) नियंत्रित करते. बदाम जास्त काळ सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित (Control Bklood Sugar Level) केली जाऊ शकते.

3. ग्लूकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त (Control Glucose Levels)
बदाम ग्लूकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि शरीरात रक्त प्रवाह सुलभ होतो. तसेच यापासून स्नायू देखील मजबूत होतात. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेटने समृद्ध असे अन्न खावे. कार्बोहायड्रेट्स शरीरात ग्लूकोजची पातळी कमी करतात.

कोणत्या 4 प्रकारच्या लोकांनी बदाम खाऊ नयेत (Almonds Side Effects)
1. जर आपल्याला पचनाशी संबंधित समस्या असतील तर आपल्याला बदाम खाताना काळजी घेणे आवश्यक आहे. मूठभर बदामांमध्ये सुमारे 170 ग्रॅम फायबर असते. शरीराला दररोज केवळ 25 ते 40 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. म्हणून जर आपण दररोज 3 ते 4 बदाम खाल्ले तर ते आपल्या शरीरातील फायबरची आवश्यकता पूर्ण करतात. जर आपण बदाम जास्त खाल्ले तर पोटासंबंधित समस्या जसे की, अतिसार आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी उद्भवू शकतात. यासह, हे पोट फुगण्याच्या समस्येचे कारण देखील बनू शकते.

2. जर आपण कोणतेही औषध घेत असाल तर आपल्याला बदामांच्या प्रमाणात लक्ष देणे आवश्यक आहे. बदामांमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियमची मात्रा असते. 3 ते 4 बदामांमध्ये 0.6mg मॅग्नेशियम असते, तथापि आपल्या शरीराला दररोज 1.8 ते 2.3mg ची आवश्यकता असते. म्हणून जर आपण यापेक्षा जास्त बदाम खाल्ले तर आपल्या शरीरावर औषधांच्या परिणामामध्ये फरक पडू शकतो. आपल्या रक्तप्रवाहात जास्त प्रमाणात मॅग्नेशियम अँटासिड, रेचक, रक्तदाबाची औषधे आणि अनेक अँटिबायोटिक्स सारख्या अँटीसायकोटिक औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

3. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून जर आपण बदामांचे अधिक सेवन केले तर आपल्याला व्हिटॅमिन ई चा ओव्हरडोस होऊ शकतो. व्हिटॅमिन ई केस आणि त्वचेसाठी चांगले आहे. हे अँटिऑक्सिडंट्सना संरक्षण देण्याचे काम करते. आपल्याला 3 ते 4 बदामांमध्ये 7.4mg व्हिटॅमिन ई मिळते. यापेक्षा जास्त घेतल्यास ते ओव्हर होऊ शकते.

4. तथापि, आपणास वजन कमी करायचे असल्यास बदाम यामध्ये आपली मदत करू शकतात. परंतु नियमित आणि नियंत्रित प्रमाणात यांचे सेवन करावे. बदामांमध्ये भरपूर कॅलरी आणि चरबी असते. 3 ते 4 बदामांमध्ये 168 कॅलरी आणि 14 ग्रॅम फॅट असते. म्हणून जर आपण दररोज मूठभर बदाम खाल्ले तर आपण 500 पेक्षा जास्त कॅलरी आणि 40 ते 50 ग्रॅम फॅटचे सेवन करता. जे की वजन कमी करण्यासाठीच्या आहाराला खराब करू शकतात. म्हणून हे महत्वाचे आहे की जर आपण वजन कमी करण्याच्या बेतात असाल तर बदामांच्या मात्रेत लक्ष द्या.