14 वर्षाच्या मुलीला बनवलं ‘शिकार’, आता कोर्टानं सुनावली 15 वर्षाची ‘शिक्षा’

अलवर : वृत्तसंस्था – अलवर जिल्ह्यातील पॉक्सो कोर्टाने (POCSO court) गुरुवारी मोठा निर्णय दिला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली. यासह कोर्टाने आरोपीला 55 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. 4 वर्षांपूर्वी धर्मेंद्र नावाच्या युवकाने 14 वर्षाच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता.

शाहजहांपूरमध्ये ही घटना घडली-
विशेष सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना शहाजहानपूर भागात 1 डिसेंबर 2015 रोजी घडली. 14 वर्षाची मुलगी शाळेत गेली होती. तेथे मुंडावार परिसरातील करणीकोट खेड्यातील रहिवासी धर्मेंद्र लाखेरा अल्पवयीन मुलीला फसवून आपल्यासोबत घेऊन गेला. नंतर धर्मेंद्रने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शाळा सुटल्यानांतरही मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला.

12 लोकांची साक्ष दिली
घडलेल्या घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपी धर्मेंद्रचे पीडित मुलीच्या घराजवळ गिफ्ट शॉप होते. नंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला आणि त्याच्याविरूद्ध कोर्टात पुरावे सादर केले. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान 12 साक्षीदारांची निवेदने देण्यात आली.

55 हजार दंड
सुनावणीनंतर उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या विधानांच्या आधारे कोर्टाने धर्मेंद्रला या गुन्ह्यात दोषी मानून विशेष न्यायाधीश अजय कुमार शर्मा यांनी आरोपी धर्मेंद्रला 15 वर्ष कारावास व 55 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुसर्‍या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा
अलवरच्या पॉक्सो कोर्टाने मागील महिन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पिताला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने आरोपींला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Visit : Policenama.com