मोठया आजाराचा ‘काळ’ बनते तुळशीची माळ, जाणून घ्या गळयात घालण्याचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – तुळशीची माळ घालणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते, तसेच हे एक रामबाण औषधदेखील आहे. केवळ आयुर्वेदच नाही तर शास्त्रज्ञांनीही तुळशीची माळ घालणे फायद्याचे मानले आहे.

तुळशीची माळ घालण्याचे धार्मिक महत्त्व
तुळशीची जपमाळ घालून त्याचा जप केल्यास मन व आत्मा शुद्ध होते, जे मनात सकारात्मक विचार आणते. असे मानले जाते की तुळशीची माळ घातल्याने सन्मान व सौभाग्य मिळते.

तुळशीची माळ अनेक आजारांवर उपाय आहे
१) ताण-तणाव दूर राहतो. संशोधनात असे आढळले आहे की, तुळशीची माळ अ‍ॅक्युप्रेशर पाॅइंट्सवर दबाव आणते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते आणि मन शांत होते. हे तणावदेखील दूर करते. जेणेकरून आपण नैराश्य, चिंता यांसारख्या आजारांपासून लांब राहतो.

२) पचन व्यवस्थित ठेवते
पचन व्यवस्थित ठेवण्याबरोबरच तुळशीची माळ घशाची समस्या दूर ठेवते. यामुळे ताप, सर्दी-खोकला, डोकेदुखी आणि त्वचेची समस्या नाहीशी होते.

३) कफ आणि वात
तुळशी माळ औषधी असल्याने कप आणि वात दोषांपासून मुक्तता प्रदान करते. जेणेकरून आपण हंगामी आणि विषाणूजन्य आजारांपासून वाचवू शकता.

४) थायरॉईड प्रतिबंध
थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करण्यास अनुमती देते आणि थायरॉईडपासून आपले संरक्षण करते. तसेच रक्तदाब नियंत्रित करते.

५) रक्त परिसंचरण सुधारते
तुळशीची माळ घातल्याने शरीरात विद्युत ऊर्जेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते. तसेच रक्ताच्या गुठळ्या, हृदयरोग यांसारख्या धोक्यापासून आपण सुरक्षित राहतो.

६) कावीळ रोग
तुळशीची माळ घातल्याने कावीळ रुग्णांसाठीदेखील खूप फायदा होतो. रुग्णाच्या गळ्यात ही माळ घातल्याने रुग्ण लवकर बरा होतो.

You might also like