ऑफलाइन राहून WhatsApp वर करा चॅटिंग, ‘या’ सोप्या पद्धतींनी तुम्ही करू शकता सेटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  फेसबुकच्या ( Facebook ) मालकीचे चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप ( Whats App) आपल्या यूजर्ससाठी ( Users) नेहमी नवीन फीचर्स ( Features) आणत असतात. आतादेखील कंपनीने नवीन फीचर आणले असून, हे फीचर्स आल्यानंतर यूजर्सला चॅटिंग
(Chatting) करताना खूप फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वी ॲपने (Disappearing Messages) आणि डार्क मोड यांसारखे नवीन फीचर्स आणले होते. हे फीचर्स खूप पसंद केले गेले होते. त्यानंतर आता पुन्हा नवीन फीचर्स आणणार असून, तुम्हाला उशिरा रात्रीपर्यंत चॅटिंग करण्याची सवय असेल, तर तुमच्यासाठी हे फीचर खास आहे. व्हॉट्सॲपवर जाताच यूजर्सचे स्टेट्स ऑनलाइन दिसत असते. त्याला लपवले जाऊ शकत नाही.

अनेकदा तुम्ही व्हॉट्सॲपवर उघडले नसले तरीदेखील इंटरनेट चालू असल्यास तुम्ही ऑनलाइन आहात असेच समजले जाते. त्यामुळे एखाद्याने मॅसेज पाठवला आणि तुम्ही वाचला नाही तर तुम्ही कोणासोबत चॅटिंग करीत आहात; तसेच ऑनलाइन दिसण्याचा अर्थ तुम्ही त्यांचे मेसेजकडे दुर्लक्ष करीत आहात, असाही अनेक जण अर्थ काढत असतात. त्यामुळे आता ऑफलाइन असतानादेखील तुम्ही चॅटिंग करू शकणार आहात. यासाठी काही स्टेप्स करून तुम्ही या सेवेचा आनंद घेऊ शकता.

फॉलो करा या सोप्या स्टेप्स

प्ले स्टोरवर (WA bubble for chat) या ॲपच्या मदतीने तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

Advt.

१) सर्वांत आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन (WA bubble for chat) ॲप डाउनलोड करा.

२) त्यानंतर ॲप अनेक ॲक्सेसिबिलिटी परमिशन्स मागेल. त्या सर्व तुम्हाला (allow) कराव्या लागणार आहेत.

३) या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲपवर आलेले मेसेजेस बबल्समध्ये यायला सुरुवात होईल.

४) या ठिकाणी चॅटिंग केल्यास तुम्ही कुणालाही ऑनलाइन दिसणार नाही. तसेच ऑफलाइन राहूनदेखील तुम्ही कुणालाही न कळता बिनधास्त चॅटिंग करू शकता.