तुम्हाला फक्त काश्मीरची चिंता ! चीनमधील मुसलमानांचे काय ? अमेरिकेचा पाकिस्तानला सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या सध्याच्या स्वभावावरून अमेरिकेने पाकिस्तानला एक सवाल केला आहे. अमेरिका म्हणते तुम्ही सारखे सारखे काश्मीरबाबत रडता पण तुम्हाला चीनमध्ये होत असलेल्या उइगर मुसलमानांचे हाल दिसत नाहीत का ?  यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची निंदा करण्यात आली कारण ते चीन विरोधात काहीच नाही बोलत. चीनमध्ये सुद्धा दहा लाख मुसलमानांची हालत खूप वाईट आहे.

चीन नेहमीच पाकिस्तान सोबत असते मग पाकिस्तानवर कोणतेही संकट येओ चीन नेहमीच पाकिस्तानला मदत करते. जैश ए मोहम्‍मद आणि हाफिज सईद यांच्यावरून पाकिस्तानवर निर्बंध घालण्याचा मामला असो किंवा दुसरा कोणताही दबाव असो पाकिस्तानला मदत फक्त चीनच करते.

चीनच्या परिस्थिती बाबत व्यक्त केली चिंता
वेल्‍स यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, मुसलमानांच्या प्रति दृष्टिकोन दाखवण्यासाठी एक समान नजर असणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे तुम्ही काश्मीरच्या मुसलमानांबाबत बोलता त्याप्रमाणे तुम्ही चीनच्या मुसलमानांबाबत सुद्धा बोला ज्यांना चीनने बंदी बनवून ठेवले आहे.

इम्रान खान यांनी पुन्हा मांडले काश्मीरचे रडगाणे
सध्या चीनमधील मुसलमानांच्या बाबतच्या खूप साऱ्या बातम्या येत आहेत मात्र त्यावर काही न बोलता इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरबाबतचे आपले रडगाणे संयुक्त राष्ट्रासमोर व्यक्त केले आहे.

शिनजियांगमध्ये चीनने खूप निर्बंध लादलेले आहेत. मुसलमानांना त्यांच्या धर्मापासून वेगळे केले जात आहे. रमजानमध्ये त्यांना रोजे ठेवण्याची परवानगी सुद्धा दिली जात नाही. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या धर्मपासून दूर ठेवण्यासाठी वेगळे कॅम्प बांधले जात आहेत.