‘कोरोना’च्या वॅक्सीनबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ‘ग्रेट न्यूज’ !

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाची लस शोधण्यात रुस पुढे गेला असला तरी अमेरिका देश देखील मागे आहे, असे नाही. त्यांनीही या लसबाबत आपले संशोधन करून प्रायोगिक लस बनविली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रायोगिक लसीला ‘ग्रेट न्यूज’, म्हणून स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंक यांनी कोरोना विषाणूसाठी तयार केलेली प्रायोगिक लस सुरक्षित असल्याचे आढळले आहे. तसेच ज्या आरोग्य स्वयंसेवकांना ही लस दिली त्या सर्व स्वयंसेवकांमधील रोग प्रतिकारशक्ती वाढल्याचे आढळले आहे. यानंतर बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून ट्विट करत ‘लसबाबत ग्रेट न्यूज’ असे म्हटले आहे. सुरवातीच्या टप्प्यात ही लस 45 आरोग्य स्वयंसेवकांना दिली होती.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी केलेल्या या ट्विटमध्ये केवळ, ‘लसीवर ग्रेट न्यूज’ एवढेच म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली नाही. त्यांनी मॉडर्नाच्या लसीसंदर्भात हे ट्विट केले असावे, असा अंदाज लावला जातोय. मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस दिली होती ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते.

आता कंपनी पुढील मानवी चाचणीची तयारी करत आहे. 27 जुलैपासून या लसीची पुढची चाचणी सुरू होणार असून सुमारे तीस हजार लोकांवर हे परिक्षण केले जाणार आहे. ही लस कोरोनाच्या संक्रमणापासून मनुष्याला`वाचवू शकते. मंगळवारी 45 लोकांवर टेस्ट केल्यानंतर त्याचे अहवाल तपासले. त्यात असे आढळले कि, स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीजची वाढ झालीय.

मॉडर्ना इंकने तयार केलेल्या व्हॅक्सीनचे नाव mRNA-1273 असे दिले आहे. ती पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. चाचणीसाठी ही लस दोनदा देणार आहेत. त्यामध्ये एका महिन्याचे अंतर राहणार असून याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही ना? हे पहिले जाणार आहे. हि लस घेतल्यानंतर फ्लू आणि ताप यांसारखी लक्षणं जाणवत आहेत. लस दिल्यानंतर अनेकांना थंडी वाजणे, ताप येणे आणि पोटदुखी ही सर्वसामान्य समस्या असते.

या लसीची पुढची चाचणी 30 हजार लोकांवर केली जाणार आहे. ही चाचणी सर्वात मोठ्या स्तरावरील मानवी चाचण्यांपैकी असणार आहे. याशिवाय ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटी, जॉनसन एंड जॉनसन आणि भारतातील भारत बायोटेक या कंपनीचे क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम आढळले आहेत. तसेच फायजर कंपनीही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.