Coronavirus Impact : अरे बाप रे ! ‘कोरोना’मुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत महिन्याभरात ‘एवढया’ अब्ज डॉलर्सचे नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन टीम –  जगभरात कोरोनाच्या थैमानामुळे उद्योगधंदेही बंद आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत गेल्या एक महिन्यामध्ये तब्बल 1 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. फोर्ब्सद्वारे नुकतीच ‘बिलिअनेर 2020’ ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 2.1 अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह ते जगातील 1001 क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत तो पसरलेला आहे. फोर्ब्सनुसार या वर्षी 1 मार्च ते 18 मार्च दरम्यान त्यांच्या कंपन्या बॉस्टन प्रॉपर्टिज आणि वोर्नाडो रियल्टी ट्रस्टच्या शेअर्समध्ये 37 टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी, अपार्टमेंच आणि गोल्फ व्यवसायालाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे. एक महिन्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे एकूण नेटवर्थ 3.1 अब्ज डॉलर्स होते.

जानेवारी 2017 मध्ये जेव्हा ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले तेव्हा ते अमेरिकेच्या इतिहासातील पहिले बिलिअनेर राष्ट्राध्यक्ष होते. न्यूयॉर्कमधील मॅनहॅट्टन परिसरात त्यांच्या अनेक इमारती आहेत. याव्यतिरिक्त त्यांचे अनेक गोल्फ कोर्स आणि वायनरीदेखील आहेत. ट्रम्प यांनी वडिल फ्रेड यांच्यासोबत व्यवसायाची सुरूवात केली होती. त्यांनी सुरूवातील ब्रुकलीन आणि क्विन्समध्ये परवडणार्‍या घरांची बांधणी केली. आता त्यांची मुलेही व्यवसायात लक्ष घालत आहेत.
पाहतात. 1982 मध्ये पहिल्यांदा त्यांचं नाव फोर्ब्सच्या यादीत आले