अमेरिका : हिलेरी क्लिटंनवर भडकल्या तुलसी गबार्ड, म्हणाल्या – ‘युध्द भडकवणारी राणी’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  डेमोक्रॅटची पक्षाची खासदार तुलसी गबार्ड यांनी शुक्रवारी माजी परराष्ट्र सचिव हिलेरी क्लिंटन यांना ‘युद्ध भडकवणारी राणी’ म्हणून संबोधले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशिया गबार्डला तिसरा उमेदवार म्हणून तयार करत असल्याचा आरोप क्लिंटन यांनी केला होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरण्याचे त्यांनी ठरवले आहे. गबार्ड या हिंदू असल्याने त्या अनिवासी भारतीयांच्या लोकप्रिय उमेदवार आहेत.

क्लिंटन यांनी शुक्रवारी एका मुलाखती दरम्यान गबार्डवर अप्रत्यक्ष आरोप केला होता की, ‘रशिया त्यांना मदत करत आहे, जेणेकरून ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवार म्हणून उभे राहू शकतील. मला वाटते की तो सध्या (डेमोक्रॅटिक उमेदवारांच्या प्राथमिक शर्यतीत) असलेली एका व्यक्तीला रशिया मदत करत आहे.’

मुलाखती दरम्यान क्लिंटनने गबार्डचे नाव घेतले नसले तरी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे माजी सहयोगी डेव्हिड प्लूफ म्हणाले की क्लिंटन यांना असा विश्वास आहे की तुलसी गबार्ड ह्या रशियाचा पाठिंबा असणाऱ्या उमेदवार आहेत.

यावर पलटवार करताना गबार्डने ट्विट केले की, ‘धन्यवाद हिलेरी क्लिंटन. आपण युद्ध भडकवणारी राणी आहात, भ्रष्टाचाराची मूर्ती आहात, जिच्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष दीर्घ काळापासून आजारी आहे आणि हे सत्य पडद्यामागून बाहेर आले आहेत. प्राथमिक उमेदवारांच्या निवडीची स्पर्धा तुमच्यात आणि माझ्यात आहे. घाबरट पणे मागे लपू नका. सरळ स्पर्धेत या.’

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी