Video : ‘अमेरिकन’ सिंगरनं भारतीयांना दिल्या ‘दिवाळी’च्या या पद्धतीनं शुभेच्छा; व्हिडिओ पाहून व्हाल स्तब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    लोकप्रिय अमेरिकन गायिका मेरी मिल्बेनने बुधवारी जगभरातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या आवाजात ‘ओम जय जगदीश हरे’ हे गाणे प्रसिद्ध केले. मिल्बेन म्हणाल्या, ‘ओम जय जगदीश हरे’ हे गाणं जगभरातील भारतीय दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी गातात, हे पूजा उत्सवाचे गाणे आहे. हे मला सतत प्रभावित करत असते आणि भारतीय संस्कृतीप्रती माझी आवड वाढवते.

कॅनेडियन स्क्रीन अवॉर्ड ग्रॅमी नामांकित संगीतकार डेरिल बेनेट यांनी याचे संगीत दिले आहे. मेरीने ‘सोनी पिक्चर्स’ चे निर्माता टिम डेव्हिस, पुरस्कारप्राप्त इंजिनिअर/मिक्सर जॉर्ज विवो, कार्यकारी संचालक जॉन स्कूझ, अ‍ॅरिझोना स्थित प्रॉडक्शन कंपनी ‘एम्बियंट स्कायझ’ चे ब्रेन्ट मेस्सी, ‘ब्राइडलबीडेना’ चे मालक डेना माली यांच्यासह मिळून यास जारी केले. या गायिकेने याचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध केला आहे, ज्यात त्या भारतीय पोशाखात दिसत आहेत.

गायिकेने म्हटले, ‘भारत, भारतातील लोक, भारतीय-अमेरिकन समुदाय माझ्यासाठी खूप खास आहे. अशाप्रकारे दिवाळी 2020 साजरी करणे हे एखाद्या आशीर्वादासारखे आहे.’ मेरीने याआधी 15 ऑगस्ट 2020 रोजी भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत गाऊन भारताबाबतचे आपले प्रेम व्यक्त केले होते.

https://youtu.be/HqaWQW60eTg