PM मोदी, HM शहांनी ‘या’ दिग्गज नेत्यावर ठेवला अतिविश्वास, ‘गणितं’ बिघडल्यानं गमावली महाराष्ट्रातील ‘सत्ता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भूपेंद्र यादव यांच्यावर दाखवलेल्या अतिविश्वासामुळे अधिक संख्याबळ असताना देखील भाजपाच्या हातून निसटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने भूपेंद्र यादव यांच्यावर सोपवली होती. फडणवीस सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार यांचा पाठिंबा घेण्याच्या निर्णयप्रक्रियेत भूपेंद्र यादव यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे याचा अंदाज घेण्यात यादव यांची चूक झाल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवार यांची पक्षातील नाराजी ओळखून भूपेंद्र यादव यांनी त्यांच्याशी बोलणी सुरू केली. अजित पवार यांच्या पाठीशी राष्ट्रवादीतील बहुतांश आमदार आहेत, अशी समजूत होती. याच समजूतीने भाजपचा घात केला. कारण सुरुवातीला संपूर्ण राष्ट्रवादीचा आपल्याला पाठिंबा असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगण्यास सुरुवात केली. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा दावा खोडत आपण शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या सत्तास्थापनेच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले आणि सर्व आमदार माघारी परतले. यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

महाराष्ट्रामध्ये भाजप नेता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार आणण्याच्या तयारीत आहे.

Visit : Policenama.com