‘डावा’ डोळा फडफडणं असतं ‘अशुभ’, ‘बिग बी’चं हे ट्विट वाचून चाहत्यांना लागली काळजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महानायक अमिताभ बच्चनची गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब आहे. त्यांची तिबेत बरी झाली की ते लगेचच आपल्या कामावर रुजु होतात. परंतु, नुकतीच त्यांच्या डोळ्याशी निगडित एक बातमी समोर आली आहे ती बातमी ऐकून चाहते हैराण झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या डोळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेयर करत लिहिले की, डावा डोळा फडफडू लागला आहे. हे अशुभ असतं असं बालपणी ऐकलं होतं. डोळ्यात काळा डाग तयार झाला आहे. डॉक्टरांना तो दाखवल्यानंतर हे वयामुळे असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की, लहानपणी जसं आई पदर थोडा गुंडाळून, त्यावर फूंकर मारून गरम करून डोळ्यावर लावायची तसे करा सर्व ठीक होईल.

डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायानंतर आईची आठवण झाल्यामुळे अमिताभ बच्चन खूप भावूक झाले. ते म्हणाले की, आता आई तर नाही, लाइटच्या मदतीने रूमाल गरम करून डोळ्याला लावला. पण त्याने काही वाटलं नाही. आईचा पदर तो आईचा पदर असतो त्याला दुसऱ्या कशाची सर नाही.

या पोस्टवर अनेकांनी इमोशनल रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, खरंच आई असती तर हा काळा डाग डोळ्यात नाही तर कपाळावर टिळा दिसला असता. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवरसुद्धा अनेकांनी आईबद्दलच्या इमोशनल रिएक्शन दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, खरंच आई असती तर हा काळा डाग डोळ्यात नाही तर कपाळावर टिळा दिसला असता. अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर व आलिया भटसोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like