Amla Benefits | आवळ्याच्या पाण्याने कमी होतो लठ्ठपणा, डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते

0
502
Amla Benefits | drinking gooseberry water reduces obesity improves eyesight
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आवळा (Amla Benefits) हे एक असे फळ आहे जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध, आवळा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. शिवाय त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्यासाठी देखील वापरला जातो. (Amla Benefits)

 

तुम्ही आवळ्याचे सेवन अनेक प्रकारे करू शकता जसे की जाम, आवळा कँडी, आवळा पावडर आणि आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचे पाणी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आवळा पाणी बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे (Health benefits of Amla water) जाणून घेऊया.

 

पोटाच्या समस्या दूर होतात
सकाळी आवळा पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन यापासून आराम मिळतो. गॅस, आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे दररोज त्याचे सेवन करू शकता.

 

रक्तशुद्धी, पिंपल्स, चहेरा चमकतो
हे रक्त शुद्ध करते आणि विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते, पिंपल्स आणि डागांची समस्याही दूर होते.

केसाच्या समस्या
रोज आवळ्याच्या पाण्याचे सेवन केल्यास केस गळणे, कोंडा होण्याची समस्या दूर होते. (Amla Benefits)

 

वजन कमी होते
आवळा पाणी रोज प्यायल्यास मेटाबॉलिज्म गतिमान होण्यास मदत होते. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते आणि जास्त कॅलरीज बर्न होतात. हे वजन कमी करण्यास मदत करते.

 

दृष्टी सुधारते
आवळ्यात व्हिटॅमिन ए, सी भरपूर असल्याने तो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Amla Benefits | drinking gooseberry water reduces obesity improves eyesight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …

Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया

Pune Police News | सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील