Amol Mitkari | ‘अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील’; अमोल मिटकरींच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari | गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अन्य काही आमदारांनी शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) सोबत येऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आता शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार मुख्यमंत्री (CM) होणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसापासून रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी पोस्टर देखील लावले होते. त्यावरून राज्यात चर्चांना उधाण आले होते. अशातच आता खुद्द राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या एका ट्वीटमुळे राज्यभर चर्चा रंगल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्लीमध्ये (Delhi) गेले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची (Senior BJP Leaders) ते भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री असतील असे सांगितल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा उलट सुलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचलता सुरू असल्याचे बोलले जात आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी यांनी राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन त्यांनी त्या ट्वीटला दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व