राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर अमृता फडणवीस म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच महाधिवेशन घेऊन आपल्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला भगव्या झेंड्याचे अनावरण केले. तसेच महाअधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी सुरुवात न करता ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी केली. त्यामुळे मनसे आगामी काळामध्ये हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मनसेच्या हिंदूत्वाच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. तर काहींनी मनसेच्या या भूमिकेमुळे आगामी काळात भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात असा अंदाज वर्तवला आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदूत्वाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी नवी दिशा ठरवल्याने ते आता चांगल्या प्रकारे काम करतील असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना देशातील राजकीय नेत्यांबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे वर्णन एन्टरटेनमेंट एन्टरटेनमेंट एन्टरटेनमेंट या शब्दात केले होते. त्यानंतर मनसेने अमृता फडणवीस यांना आपल्या शैलीत उत्तर दिले होते.
राज ठाकरे यांच्या हिंदूत्वाच्या भूमिकेचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे. परंतु परप्रांतिय लोकांवर अन्याय अत्याचार करणे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलल्यास आगामी काळात भाजप मनसे एकत्र येऊ शकतात असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. मात्र, मनसेने परप्रांतियांविरोधातील आपली भूमिका बदलली पाहिजे असे ही त्यांनी म्हंटल.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like