‘या’ 50 स्मार्टफोनला मिळणार Android 10 चं ‘अपडेट’, ‘इथं’ पाहा लिस्टमध्ये तुमचा फोन आहे की नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलची स्मार्टफोन ऑपरेटींग सिस्टम अँड्रॉयडचे सर्वात लेटेस्ट वर्जन आहे. नव्याने लाँच होणारे बहुतांश स्मार्टफोन हे अँड्रॉयड 10 सोबतच सादर करण्यात येत आहेत. परंतु, काही अँड्रॉयड फोन जुने सुद्धा आहेत, ज्यांच्यामध्ये अँड्रॉयड 10 चे अपडेट मिळणार आहे. त्या 47 स्मार्टफोनबाबत जाणून घेवूयात ज्यांना अँड्रॉयड 10 चे अपडेट मिळणार आहे. या यादीत शाओमी, रियलमी, नोकिया आणि वनप्लसशिवाय अन्य कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

Realme c3
रियलमी सी3 कंपनीचा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 6,999 रुपये आहे. हा फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. रियलमी सी3 ला अँड्रॉयड 10 सोबत लाँच करण्यात आला आहे.


Realme 2 Pro
या फोनला जून 2020 पर्यंत अँड्रॉयड 10 अपडेट मिळू शकतो. या फोनची किंमत सध्या 10,990 रुपये आहे. Realme 2 Pro सप्टेंबर 2018 मध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. याशिवाय रियलमीचे Realme 5S, Realme 5, Realme 3i, Realme 3,Realme X2 Pro, Realme X, Realme 5 Pro, Realme X, Realme 3 Pro फोनला सुद्धा अँड्रॉयड 10 चा मिळणार आहे.

शाओमीबाबत बोलायचे तर या यादीत पहिले नाव Xiaomi Mi A3 चे आहे, कारण हा एक अँड्रॉयड वन स्मार्टफोन आहे. याशिवाय Xiaomi Redmi K20 Pro, Xiaomi Redmi Note 8 Pro ला सुद्धा अँड्रॉयड 10 चा अपडेट मिळणार आहे.

वीवो फोनबाबत बोलायचे तर Vivo Nex च्या Vivo V15, Vivo V15 Pro, Vivo iQOO ला सुद्धा अँड्रॉयड 10 चा अपडेट मिळणार आहे. तर Vivo V17 आणि Vivo V17 pro सुद्धा अँड्रॉयड 10 चा अपडेट मिळण्याची शक्यता आहे.

OnePlus 5 टी पासून आतापर्यंत लाँच झालेल्या सर्व फोनला अँड्रॉयड 10 चा अपडेट मिळेल.

तसेच नोकियाचे सर्व फोन स्टॉक अँड्रॉयड आहेत. Nokia 1 पासून Nokia 8.1 पर्यंत अँड्रॉयड 10 चा अपडेट मिळेल.

हुवावेचे फोन ज्यांना मिळणार अँड्रॉयड 10 चा अपडेट
Huawei P20 Pro, Honor 9X, Honor 20 Pro, Honor 20, Honor Play,Honor 8X सारख्या फोनचा समावेश आहे.

आता सॅमसंगच्या फोनचा प्रश्न आहे तर Samsung Galaxy M10 पासून गॅलेक्सी एस10 लाइट पर्यंतच्या सर्व फोनमध्ये अँड्रॉयड 10 मिळेल. सॅमसंगचे नवे फोन अँड्रॉयड 10 सोबत लाँच करण्यात येत आहेत.