‘उर्मिला मातोंडकरांचं नाव आमच्याकडे चर्चेत नाही’, शिवसेनेच्या मंत्र्याचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. यावर आता शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी यांनी प्रतिक्रिय दिली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं नाव आमच्याकडे चर्चेत नाही. याबाबत केवळ मीडिया चर्चा आहेत असं म्हणत त्यांनी या मुद्द्यावर पडदा टाकला. आज त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला होता. यावेळी ते बोलत होते.

‘अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं नाव आमच्याकडे चर्चेत नाही’

Advt.

अनिल परब म्हणाले, “अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं नाव आमच्याकडे चर्चेत नाही. याबाबत केवळ मीडिया चर्चा आहेत. चव्हाट्यावर बसून चर्चा करायची ही नावं नाहीत. राज्य सरकार काळजीपूर्वी नावं देत आहे.”

‘राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवू त्यानंतर काय होतंय ते पाहू’

पुढं बोलताना परब म्हणाले, “कॅबिनेटनं यासंदर्भात ठराव केला आहे. स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे, असं वाटत नाही. राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवू त्यानंतर काय होतंय ते पाहू असंही परब यांनी यावेळी सांगितलं.