अंक ज्योतिष 13 फेब्रुवारी : गुरुवारी यश देईल तुमचा ‘हा’ लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

मूलांक – 1
तुम्हाला सुख आणि वस्तूेची कमतरता भासेल. संततीच्या बाबतीत चिंता सतावेल. मशनरी इत्यादी उपकरण बिघडल्याने कामात अडचण निर्माण होईल. कामाचा व्याप वाढल्याने तुमचा तणाव वाढेल. यासाठी भावना नियंत्रणात ठेवा. कौटुंबिकदृष्ट्या वेळ तुमच्यासोबत आहे.
शुभ अंक – 4
शुभ रंग – हिरवा

मूलांक – 2
विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचा निकाल त्यांना अनुकूल असा येईल. नातेवाईकांकडून आज कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक सुख-शांतीमध्ये तुमची भूमिका महत्वाची राहणार आहे. प्रवासाचा छंद असेल तर तो नक्की पूर्ण होईल.
शुभ अंक-11
शुभ रंग- गडद निळा

मूलांक – 3
समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्हावे लागेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. तुम्ही जे काम कराल ते योग्य पद्धतीने पार पडेल. पत्नीच्या सहकार्यामुळे कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. जर धनवृद्धी हवी असेल तर योग्य पद्धतीने गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्यासाठी आज योग्य पर्याय निवडाल.
शुभ अंक- 14
शुभ रंग – पिवळा

मूलांक – 4
कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहिल. संतती हवी असलेल्या जातकांना आनंदवार्ता समजेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर मेहनत करावी लागेल. बँकेकडून वाहन किंवा घरासाठी कर्ज घेऊ शकता.
शुभ अंक – 14
शुभ रंग – काळा

मूलांक – 5
तुम्हाला भांडखोर लोकांपासून दूर रहावे लागेल. आपल्या कर्मचार्‍यांवर व सहकार्‍यांच्या हालचालीवर संपूर्ण लक्ष ठेवावे लागेल, व्यवसायाशी संबंधित काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतात. प्रेम प्रसंग आणि सोशल नेटवर्किंग साइट्सपासून दूर रहा. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात सुवर्णसंधी मिळू शकते.
शुभ अंक – 4
शुभ रंग – जांभळा

मूलांक – 6
तुम्ही वाईट लोक, वाईट संगतीपासून दूर रहा. ऑफिस किंवा व्यापारात काही लोक तुमच्यावर जळतात, आज तुम्ही थेट त्यांच्या विरोधात जाऊ शकता. सरकारी नोकरीची संधी येऊ शकते. आज तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – गुलाबी

मूलांक – 7
आपल्या कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करू शकता. कुटुंबातील एखाद्या नातेवाईकाच्या बाबतीत वाईट घटना घडण्याची शक्यता आहे. संततीच्या शिक्षणावर खर्च होऊ शकतो.
शुभ अंक – 16
शुभ रंग – तपकिरी

मूलांक – 8
कुटुंबासाठी आज तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदी सारखा मौल्यवान धातू इत्यादीची खरेदी करू शकता. पती-पत्नीमधील संबंध सुधारतील. आपसातील संबंध चांगले होतील. नव्या लोकांशी संपर्क येऊ शकतो. तुमचा व्यवहारीक स्वभाव आणि व्यक्तीमत्वामुळे लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील.
शुभ अंक -3
शुभ रंग – पिवळा

मूलांक – 9
तुम्ही व्यापारी असाल आणि पार्टनरशिपमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर दिवस चांगला आहे. विशेष करून मनोरंजन क्षेत्रात चांगला फायद होईल. अर्थहिन गोष्टींमध्ये अडकून पडू नका. छोटा प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे मार्गात येणार्‍या सर्व अडचणी दूर करण्यास सक्षम आहात.
शुभ अंक- 12
शुभ रंग – लाल

You might also like