अंक ज्योतिष : ‘हा’ मुलांक असणार्‍यांना प्रेमात मिळेल ‘यश’, जाणून घ्या आजचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
मन विचलित आहे. आज लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. शिक्षणात अडचणी येऊ शकतात. ज्यामुळे घरात अशांतता राहिल. जास्त मेहनत करण्याची गरज आहे.
शुभ अंक – 14
शुभ रंग – पिवळा

अंक – 2
सरकारी नोकरी करणार्‍यांची बदली होऊ शकते. हे परिवर्तन चांगले चांगले परिणाम भविष्यात देऊ शकते. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या शोधत असाल तर शोध पूर्ण होईल. आई-वडीलांसोबत एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
शुभ अंक-9
शुभ रंग- क्रीम

अंक – 3
कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. मुलांकडून अडचणी येऊ शकतात. विवाहितांना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, समजूतदारपणामुळे त्या सोडवू शकता. जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि प्रेमात यश मिळेल. विवाहाचे योग आहेत.
शुभ अंक- 12
शुभ रंग – सफेद

अंक – 4
जर आज एखादे नुकसान झाले तर त्याची भरपाईदेखील लवकर होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. भावनिक आणि कौटुंबिक संबंधांकडे लक्ष द्या. अचानक कुठेतरी प्रवासाला जाण्याचा योग आहे.
शुभ अंक – 6
शुभ रंग – क्रीम

अंक – 5
उत्साहाचा दिवस आहे. जोडीदाराची साथ आणि प्रेम मिळेल. वाहन किंवा घर खरेदी करू शकता. अडलेली कामे पूर्ण होतील. नात्यांबाबत द्विधा स्थिती निर्माण होईल.
शुभ अंक – 21
शुभ रंग – सिल्व्हर

अंक – 6
तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. संपत्तीबाबत जबाबदारीने कामे करा. काम जास्त असल्याने मजामस्ती करू शकणार नाही. प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाऊ शकता. नात्यात समस्या येऊ शकते.
शुभ अंक – 2
शुभ रंग – गुलाबी

अंक – 7
आज मन आनंदी असेल. प्रिय व्यक्तींकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होतील. परदेश प्रवासाला जाणे आणि नवे संबंध होण्याचे योग आहेत. कोर्टाच्या कामात विजय मिळेल.
शुभ अंक- 9
शुभ रंग – ग्रे

अंक – 8
उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यास आजचा दिवस शुभ आहे. नवी धोरणे तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देतील. विवाहाच्या प्रस्तावासाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबासोबत छोटा प्रवास करू शकता.
शुभ अंक – 17
शुभ रंग – पिवळा

अंक – 9
दिवसाच्या सुरूवातील कौटुंबिक प्रकरणात अस्वस्थ राहाल. कुटुंबातील एखादी व्यक्ती नमते घेणार नाही. पत्नीशी मतभेद होऊ शकतात. करियरमध्ये मीपणा येऊ देऊ नका.

शुभ अंक – 13
शुभ रंग – नांरगी