‘सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय, त्याच्याच मित्रासोबत सुरू आहे अफेअर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सीबीआयने आतापर्यंत ७ जणांची चौकशी केली आहे. शुक्रवारी पहिल्यांदा अभिनेत्री रिया चक्रवर्ती चौकशी सुरु झाली आहे. त्याआधी रियाने माध्यमांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान रियाने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

या वेळी बोलताना सुशांतच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी रियाने उघड केल्या असून, तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सुशांतच्या कुटूंबीयांसोबत उभं राहणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणूनच रियाने अंकितावर टीका केली आहे. मागील चार वर्षात अंकिता कुठं होती, आता सुशांतच्या निधनानंतर ती हे सगळं का बोलत आहे, असा सवाल रियाने उपस्थित केला. सुशांत गेल्यावर त्याची विधवा असल्याचं नाटक करतेय. तेवढंच नाही तर सुशांतच्या मित्रासोबतच आता ती रिलेशनशीपमध्ये आहे. तीच वागणं समजण्यापलिकडच आहे. तर अंकिताला रियाने सवत असं संबोधलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती ही मुख्य आरोपी असून, आठ दिवसांपासून सीबीआयने रियाची चौकशी केली नव्हती. शेवटी शुक्रवारी सकाळी सीबीआयनं समन्स बजावल्यानंतर रिया चौकशीसाठी हजर झाली. आठ तास तिची चौकशी सुरु होती. यावेळी दोन वेळा सीबीआयचं पथक वांद्रे येथील सुशांतच्या घरी जाऊन आलं. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सर्वात आधी या प्रकरणाची चौकशी केलेली. रियासह तिचे कुटुंब आणि इतर १५ जणांची ‘ईडी’ने चौकशी केली. म्हणून सीबीआयची सारी भिस्त ईडीवरच आहे. सीबीआय रियाच्या मोबाइल चॅटची तसेच सुशांत-रिया संबंधाची माहिती ईडीकडून प्राप्त करत आहे. तसेच अंमली पदार्थांबाबतच्या तपासात अंमली पदार्थविरोधी विभागाला (एनसीबी) प्रथम माहिती ईडीकडूनच मिळाली होती.