पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीत ‘बंडखोरी’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरीचे मतदार संघात राष्ट्रवादीकडून सुलोचना शिलवंत – धर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर प्रथम आमदार राष्ट्रवादीचे नेते आण्णा बनसोडे आणि इच्छुक असणारे शेखर ओव्हाळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून उद्या सकाळी अर्ज भरणार असल्याचे दोघांनीही पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा मधील प्रथम आमदार होते. या वेळेस आण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी कडे उमेदवारी मागितली होती. पक्षाकडून तसे आश्वासन देखील देण्यात आले होते. परंतु टीव्ही वर राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने निराशा झाली. यावरून माझी काय चूक झाली? असा सवाल आण्णा बनसोडे यांनी उपस्थित केला आहे. मी गेली 10 वर्षे नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची कामे करत आहे, त्यामुळे मी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. मी अपक्ष लढणार असून सर्व पक्षीय नगरसेवक, कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचे शेखर ओव्हाळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी ऐन वेळी नगरसेवक सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आण्णा बनसोडे आणि ओव्हाळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Visit : Policenama.com