मागील पराभवाचा वचपा काढा, अण्णा बनसोडे यांना विजयी करा : शाम लांडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मागील विधानसभा निवडणूकीत पिंपरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा केवळ 2 हजार 235 मतांनी झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यावेळी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करुन मागील पराभवाचा वचपा काढा, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे नगरसेवक शाम लांडे यांनी येथे केले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी फुगेवाडी, कासारवाडी भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी लांडे बोलत होते. यावेळी पदयात्रेत उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर रंगनाथ फुगे, ज्येष्ठ नगरसेविका माई काटे, नगरसेवक राजू बनसोडे, रोहित काटे, माजी नगरसेवक एकनाथ मोटे, किरण मोटे, रामभाऊ पिंपळे, दत्तोबा लांडगे, उषा वाखारे, सुरदास गायकवाड, अभिमन्यु दहितुले, चंद्रकांत लांडगे, राजद्र काटे तसेच युवराज गायकवाड, मनोज वाखारे, हाजी शेख, इरफान काजी, बादशहा शेख, मेहबुब शेख, अविनाश गायकवाड, संजय गरुड, रणजित जाधव, नंदू काशिद, सतिष लांडगे, अमोल मोटे, राजेंद्र शेळके, भागवत जवळकर, शिल्पा बिडकर, उषा पवार, विकास आबा लांडे, महेश जवळकर, लतिफ सय्यद, आदम पटेल, हारुन शेख, लहु लांडगे, रशिद सय्यद आदी सहभागी झाले होते.

या पदयात्रेस फुगेवाडी, कासारवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून अण्णा बनसोडे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ‘जिंदाबाद, जिंदाबाद अण्णा बनसोडे जिंदाबाद’, ‘कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दूमदूमून टाकला.

यावेळी लांडे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मात्र, सन 2017च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यापासून पिंपरी चिंचवडची दुर्दशा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना विजयी करून आपला संताप व्यक्त करावा, असे आवाहन लांडे यांनी केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी