मएसो वाघिरे विद्यालय सासवड येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2019- 20 जल्लोषात साजरा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – मएसो वाघिरे विद्यालय सासवड शनिवार(दि.२१) रोजी सकाळी ठीक-७.३० वा विविध गुणदर्शन कार्यक्रम सकाळ,दुपार, ज्युनिअर विभाग खूप जल्लोषात साजरा झाला. सामाजिक समस्या,पर्यावरण, महिला समस्या,शेतकरी गीत, मएसो शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष अशा विविध विषयांवर आधारित नाटिका, नृत्य विद्यार्थ्यांनी खूप सूंदर पध्दतीने साजरा केलीत. विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी सासवड पोलीस स्टेशन पोलीस सबइन्स्पेक्टर गुगे यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Maso-Wagheer-School
विविध गुणदर्शन कार्यक्रम परीक्षक म्हणून लोमटे मॅडम, माधुरी झेंडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमस्थळी विविध गुणदर्शन कार्यक्रचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांनी सर्व कलागुणांनी युक्त व विविध मनोरंजनात्मक महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केलेत.यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन सर्व शिक्षकांना,शिक्षकेतर कर्मचारी, विविध गुणदर्शन कार्यक्रम समिती ,विद्यार्थी, यांना कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले.

सोमवार रोजी दुपारी ठीक-४.०० वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, प्रशालेतील गुणवान विद्यार्थी, विविध विषयातील प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी, विविध शालेय स्पर्धेत प्राविण्य, मिळविणारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा, इ-10 वी एसएससी बोर्ड परीक्षा (मार्च-19) इ-12 वी एचएससी बोर्ड परीक्षा (फेब्रु-19)प्रथम क्रमांक, यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यासाठी प्रशालेचे बाबासाहेब शिंदे (शाळा समिती अध्यक्ष) प्रमुख अतिथी संजीवजी रस्तोगी (MD-Syngenta Services Pvt.Ltd-Pune) रस्तोगी मॅडम, सौ. शशी शिंगी (रोटरी क्लब पुणे) सौ. पद्मजा नायडू (रेड क्रॉस सोसायटी-पुणे) प्राचार्य जगदीश शेवते(नसरापूर), राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू उदय पवार,मुख्याध्यापक शिंदे उपमुख्याध्यापक जाधव, पर्यवेक्षक रामदासी शिक्षक प्रतिनिधी तोडकर अभिजीत, शिक्षकेतर प्रतिनिधी म्हेत्रे वैभव, क्रीडाअध्यक्ष सहारे हिरामण व सकाळ, दुपार, ज्युनिअर विभाग विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी संजीवजी रस्तोगी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून पुढे जावे अशी इच्छा व्यक्त केली. प्रशालेसाठी काही तरी करण्याची मनापासून इच्छा त्यांनी व्यक्त केली.
Saswad
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना, पालकांना,शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शालेय विविध समिती अहवाल,विविध शालेय स्पर्धा,शालेय उपक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, यातील यश संपादन केलेल्या व शालेय महत्वपूर्ण उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक शिंदे यांनी दिली.

उपमुख्याध्यापक जाधव,पर्यवेक्षक रामदासी शिक्षक प्रतिनिधी तोडकर अभिजीत, शिक्षकेतर प्रतिनिधी म्हेत्रे वैभव, क्रीडा अध्यक्ष सहारे हिरामण,विद्यार्थी प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पुढील यशस्वी आयुष्यासाठी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रिकामे यांनी केले. आभार प्रदर्शन वार्षिक स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी तोडकर अभिजीत यांनी मानले. व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा दिली. सर्वांच्या सहकार्याने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय जल्लोषात साजरा झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/