Coronaviurus : हर्ड इम्यूनिटीमूळे मोठ्या प्रमाणात होणार मृत्यू, अमेरिकेतील अग्रगण्य महामारी रोग तज्ज्ञ डॉ. फाउची यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अग्रगण्य महामारी रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटले की, जर कोरोना विषाणू महामारी संपविण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा प्रयत्न केला गेला तर मोठ्या प्रमाणात मृत्यू होतील. ते म्हणाले की, जर प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि लक्षणे नसलेल्या आजारी लोकांची टक्केवारी जास्त असली तरी मोठ्या प्रमाणात लोक मरतील.

फाउची म्हणाले की, कोरोना व्हायरस कोणत्याही रोगाने आधीच ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप धोकादायक आहे. लठ्ठपणा, उच्चरक्तदाब किंवा मधुमेहाशी झुंजणार्‍या लोकांना कोरोना खूप धोकादायक आहे. यामुळे, हर्ड इम्युनिटी मिळविणे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. हर्ड इम्युनिटी अश्या स्थितीला म्हणतात, जेव्हा लोकसंख्येमध्ये इतके लोक संक्रमित होतात की विषाणूचा प्रसार थांबतो. ही प्रतिकारशक्ती दोन प्रकारे मिळविली जाऊ शकते, एक म्हणजे लोकांना लसीकरण करणे. दुसरे म्हणजे, लोकांना स्वत: संक्रमित होऊन बरे व्हावे लागेल.

असा अंदाज वर्तविला जात आहे की, कोरोना विषाणूच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीसाठी लोकसंख्येच्या 60 ते 70 टक्के लोकांना लागण होण्याची गरज आहे. यापूर्वी, तज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली होती की, कोरोनापासून बरे होणारे लोक किती काळ व्हायरसपासून संरक्षित आहेत, सध्या पुरेसा डेटा उपलब्ध नाही. जेएचबी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. डेव्हिड डॉडी म्हणाले की, कोरोनाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती 3 ते 4 महिन्यांत संपली तर आपण हर्ड इम्युनिटीबाबत बोलले देखील नाही पाहीजे.