PMC नंतर J&K बँकेत 1100 कोटींचा घोटाळा ! देशभरात ACB कडून 16 ठिकाणी छापे

जम्मू : वृत्तसंस्था – पीएमसी घोटाळा ताजा असतानाच आणखी एक 1100 कोटी रुपयाचा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. जम्मू-काश्मीर बँकेच्या 1100 कोटी रुपयाच्या कथीत कर्ज घोटाळा प्रकरणात अ‍ॅन्टी करप्शनने (ACB) तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने 1100 कोटी रुपये राइस एक्सपोर्टस इंडिया अ‍ॅग्रो लि. (REI) या कंपनीला दिले आहेत.

एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बँकेच्या कथीत कर्ज घोटाळा प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर वेगवेगळी पथके तयार करून छापे टाकण्यात आले. एसीबीच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष मुश्ताक अहमद शेख यांच्यासह 12 पेक्षा अधिक बँक अधिकाऱ्यांच्या काश्मीर, जम्मू आणि दिल्ली येथील घरांवर छापे टाकले. यामध्ये काश्मीरमध्ये 9, जम्मूमध्ये 4 आणि दिल्लीमध्ये 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

आरईआय अ‍ॅग्रोवर छापे

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरईआयचे अध्यक्ष संजय झुनझुनवाला आणि उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संदीप झुनझुनवाला यांच्या दिल्ली येथील घरावर छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांने सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरु असून राजधानी दिल्लीमध्ये आणखी तीन टीन छापे टाकत आहेत.
प्राथमिक तपासामध्ये बँकेच्या मुंबईतील माहिम आणि नवी दिल्ली येथील अंसल प्लाजा येथील शाखेचे अधिकाऱ्यांनी बनावट कागपत्राच्या आधारावर आरईआय अ‍ॅग्रोला 2011 आणि 2013 दरम्यान 800 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

हे कर्ज मंजूर करताना बँकेकडून बँकेचे नियमांकडे दुर्लक्ष करून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर 2014 मध्ये हे कर्ज प्रकरण एनपीएमध्ये आले. आरईआय कंपनीने आपले मुख्य कार्यालय कोलकत्ता आणि कॉरपोरेट ऑफिस दिल्ली येथे असून कर्जासाठी मुंबई येथील माहिम शाखेकडे संपर्क साधला होता. मात्र, या कंपनीचे मुंबईमध्ये कोठेही कार्यालय नाही. बँक अधिकाऱ्यांनी संगनमत करून माहिम शाखेकडून 550 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. याच प्रकारे कंपनीने वंसत विहार अंसल प्लाजा शाखेतून 139 कोटी रुपयांचे मंजूर करवून घेतले होते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like