Anti Corruption Bureau Thane | 10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक (PSI) अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणुकीच्या प्रकरणात (Fraud case) अटक न करण्यासाठी 10 लाखांची मागणी (Demanding Bribe) करुन अडीच लाखांवर तडजोड करुन 50 हजारांची लाच स्विकारणाऱ्या (Accepting bribe) दोन पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) सोमवारी (दि.29) रात्री रंगेहात पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) मीरा रोड पोलीस ठाण्यात ही कारवाई केली असून पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले (Govind Ekilwale) आणि प्रकाश कांबळे (Prakash Kamble) यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर मीरा रोड पोलीस ठाण्यात (Mira Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठाणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार,यातील एका तक्रारदाराविरुद्ध शाहाबुद्दीन पठाण यांनी फसवणुक केल्याचा तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी मीरा रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले (वय-32 रा. मीरा रोड, ठाणे) हे करीत होते. त्याच अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करु नये यासाठी गोविंद यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 10 लाख रुपये लाच मागितली. त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांनी त्यांना प्रोत्साहित केल्याची तक्रार 2 नोव्हेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Bureau Thane) प्राप्त झाली.

या तक्रारीच्या अनुषंगाने 3 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. तेव्हा एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे रक्कम न सांगता लाचेची मागणी केली. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदाराकडे पुन्हा अडीच लाखांची मागणी केली. यावेळी उपनिरीक्षक कांबळे यांनीही ही लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित करुन 29 नोव्हेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (सोमवार) मीरा रोड पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (SP Dr. Punjabrao Ugale) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

 

त्यावेळी एकीलवाले यांनी तक्रारदार यांच्या खासगी वाहनाने पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर नेले. त्याठिकाणी तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्विकारली. ती त्यांचा हस्तक मुकेश कोटीयन उर्फ अण्णा यांच्याकडे देऊन ते दोघेही पसार झाले. फरार झालेल्या एकीलवाले यांना ठाण्यातील कोर्टनाका येथील पॅव्हिलियन हॉटेलमधून तर कांबळे यांना त्यांच्या मीरा रोड येथील राहत्या घरातून अटक केली. तर त्यांचा तिसरा खसगी साथिदार  मुकेश उर्फ अण्णा फरार आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | mira bhayanders two corrupt police sub inspectors caught acb ten lakh was demanded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ATM Rule Change | मोठी बातमी ! ATM मधून कॅश काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा अडकतील पैसे

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 536 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Atrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स, चित्रपटातील पहिलं गाणं ‘चका-चक’ प्रदर्शित

NCP MLA Babajani Durrani | आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान; उधाण, प्रचंड खळबळ

Madhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या मोनोकनीमध्ये जलवा, रिकामे केस आणि मेकअपमध्ये स्टनिंग लुक

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’