टी-20 क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितमध्ये कोण सर्वश्रेष्ठ कप्तान, जाणून घ्या मायकल वॉनचं म्हणणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही भारतीय क्रिकेट टीमच्या बॅटिंगचा कणा मानला जातो. दोघेही त्यांच्या खेळात सातत्य ठेऊन खोऱ्याने रण करत आहेत. ज्यावेसळेस विराट मॅच खेळत नसतो तेव्हा कधी कधी रोहितला टीम इंडियाचा कर्णधार होण्याची संधी मिळत आली आहे. रोहितने जेवढ्या वेळेस भारतीय टीमचं कर्णधारपद भूषवले आहे त्यावेळेस त्याने चांगलं प्रदर्शन केलं आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय टी -२० संघाचे कर्णधारपद रोहितला मिळण्याची शक्यता होती, बऱ्याच क्रिकेट तज्ज्ञांनीही याबद्दल मत व्यक्त केले होते. पण रोहितला अजून संधी मिळाली नाही.
जलद प्लॅटफॉर्म असणाऱ्या टी -20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. तिथं त्याचं प्रदर्शन आणि यश विराटपेक्षा खूप चांगलं आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने चार वेळा IPL जिंकली आहे.तर विराटला बंगळुरूला एकदाही जेतेपद जिंकून देत आलं नाही. रोहितचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वत: ला शांत ठेवतो तसेच गोलंदाज कधी आणि कसे वापरायचे हे देखील त्याला चांगलं माहित असते.

IPL मध्ये सोमवारी खेळलेल्या सामन्यात विराटच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये रोहितच्या संघाचा पराभव केला होता. परंतु दोन्ही संघांनी चांगली कामगिरी बजावली. प्रथम स्कोअर बरोबरीत झाल्यानंतर सुपर ओव्हर झाली. यामध्ये बंगळुरूने मुंबईवर मात केली होती. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने टी -20 क्रिकेटमधील रोहित आणि विराटच्या कर्णधारपदाबद्दल आपले मत मांडलं आहे.

माजी कर्णधार मायकेल वॉनने गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दोघेही फलंदाज म्हणून उत्तम आहेत, परंतु टी -20 कर्णधार म्हंटलं तर यात रोहित शर्मा उजवा ठरतो. टी-20 प्रकारातील तो एक महान कर्णधार आहे. रोहित शर्माचे वैशिष्ट्य म्हणजे तो शांत आहे आणि त्याच्याकडे संयमही आहे. तसेच कर्णधार म्हणून तो हुशार आहे. रोहितकडे टी -20 क्रिकेट कसे खेळायचे याची नेहमी चांगली योजना असते.