जुन्या iPhone ला फ्री मध्ये रिपेअर करणार Apple पैसे सुद्धा मिळणार परत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्याकडे जर जुना आयफोन खराब अवस्थेत पडून असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अमेरिकी टेक कंपनीने आयफोन 6S आणि आयफोन 6S प्लस साठी फ्री रिपेरिंग प्रोग्रामचे आयोजन केले आहे.

मात्र सगळ्या फोनसाठी ही स्कीम लागू होत नाही तर केवळ ऑक्टोबर 2018 ते ऑगस्ट 2019 च्या दरम्यान बनलेले 6S आणि  6S प्लस या मॉडेल साठीच रिपेअरिंग करून दिले जाणार आहे. कारण कंपनीने सांगितल्या प्रमाणे या काळात बनलेल्या काही मॉडेलमध्ये ऑन होण्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला आहे.

जर तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही फोन कोठून घेतला आहे तर तुम्ही आपल्या आयफोन बॉक्स वरील सीरिअल तपासून कंपनीच्या अधिकृत साईटवर हा नंबर टाकून त्याची माहिती मिळवू शकता. तसेच अधिकृत साईट वरती तुम्ही तुमचा फोन रिपेरिंगसाठी पात्र आहे किंवा नाही हे देखील चेक करू शकता.

जर तुमचा आयफोन फ्री रिपेअरिंगसाठी पात्र दाखवत असेल तर तुम्ही Apple ऑथराइज्ड सर्विस सेंटरमध्ये जाऊन मोबाईल फ्री मध्ये रिपेअर करून घेऊ शकता.

कंपनीने सांगितले की फोनच्या कॉम्पोनेंटमध्ये बिघाड असल्यामुळे फोन चालू होण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे अशा मॉडेलला कंपनीने फ्रीमध्ये रिपेअर करून देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच फोन चालू होण्यासाठी जर ग्राहकांनी अशा मॉडेलला काही खर्च केला असेल तर तोही खर्च कंपनी ग्राहकांना परत देणार असल्याचे सांगितले आहे.

Visit : Policenama.com