YOUNG ARTISTE 2020 : भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय टॅलेंट स्पर्धेसाठी करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंग आर्टिस्ट २०२० ही देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि आधुनिक कला क्षेत्राची आवड असणाऱ्यांना व त्यांचे कलागुण प्रदर्शित करण्याला संधी देते. यंग आर्टिस्ट २०२० मध्ये संगीत आणि नृत्य या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभेची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. अमजद अली खान, शोवना नारायण, अरुणा साईराम, टेंरेस लुईस आणि शाल्मली खोलगडेसह अन्य कलाकारांकडून संरक्षण आणि मार्गदर्शन घेण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. हे व्यासपीठ २० विविध प्रकारात अंतिम स्पर्धकांना १०० शिष्यवृत्ती प्रदान करुन युवा प्रतिभाला वाढवण्याची संधी प्रदान करेल.

२० श्रेणींना असे विभागले गेले आहे

भारतीय शास्त्रीय प्रकारात कर्नाटक आणि हिंदुस्थानी गायन, तबला, मृदंगम, बासरी, सितार आणि सरोद, व्हायोलिन, भरतनाट्यम, ओडिसी आणि कथक आणि समकालीन श्रेणींमध्ये भारतीय व पाश्चात्य गायन, पियानो आणि कीबोर्ड, गिटार यांचा समावेश आहे. , ड्रम, वेस्टर्न व्हायोलिन, हिप-हॉप, बॉलिवूड आणि समकालीन नृत्य यांचा समावेश आहे.

यंग आर्टिस्ट २०२० चे सुरुवातीला ऑनलाइन ऑडिशन असेल, ज्यासाठी सहभागी नोंदणी करू शकतील. ग्रँड यंग आर्टिस्ट फेस्टिव्हल चे आयोजन ऑगस्ट २०२० मध्ये बंगळुरू येथे होणार आहे, ज्यात १०० युवा कलाकार संगीत क्षेत्रातील दिग्गजांसमोर आणि ज्युरी सदस्यांसमोर राष्ट्रीय रंगमंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करतील.

प्रवेशाकरिता मार्गदर्शक सूचना 

यंग आर्टिस्ट २०२० हे ११-१८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.

यंग आर्टिस्ट २०२० बद्दल 

यंग आर्टिस्ट २०२० ही देशभरातील शालेय मुलांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभेची स्पर्धा आहे. या मंचाचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहित आणि प्रेरित करणे हे आहे. यंग आर्टिस्ट जास्तीत जास्त मुलांना प्रोत्साहित करण्याचे काम करत आहे, म्हणून सर्व २० प्रकारातील अव्वल असणाऱ्या पाच मुलांना २५ लाख रुपयांच्या १०० शिष्यवृत्त्या दिल्या जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी यंग आर्टिस्ट २०२० या वेबसाइटला भेट द्या

https://www.youngartiste.com/home

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/