‘Facebook’ला ‘WT: Social’ टक्कर देणार,1 लाख 33 हजाराहून अधिक युजर्स प्रतीक्षेत, जाणून घ्या कसे व्हाल ‘जॉइन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आणि ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी इंटरनेटवर WT: Social ही एक नवीन सोशल मीडिया वेबसाइट सुरू केली गेली आहे. विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांनी हे WT: Social सुरू केले आहे . ही वेबसाइट विकिपीडियाप्रमाणेच डोनेशनच्या माध्यमातून चालवण्याचे वेल्सचे उद्दीष्ट आहे.

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रमाणे, डब्ल्यूटी सोशल वापरकर्त्यांना वापरकर्त्यांना लेख शेयर करण्यास अनुमती देईल, परंतु ते जाहिरातींऐवजी डोनेशनद्वारे कार्य करेल. अहवालानुसार वेल्स म्हणाले की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे बिझिनेस मॉडेल संपूर्ण जाहिरातीद्वारे चालविले जाते, हेच या समस्येचे कारण आहे.

असे व्हा जॉइन –

WT: Social मध्ये विनामूल्य सामील होऊ शकता, परंतु यासाठी आपल्याला एकतर डोनेशन द्यावे लागेल किंवा मित्राला इन्व्हिटेशन पाठवावे लागेल.

नोंदणी करण्यासाठी …

सर्व प्रथम, आपण आपले नाव आणि आडनाव टाका.
यानंतर, आपला ईमेल ऍड्रेस टाका.
त्यांनतर Password सेट करा.
त्यानंतर आपली जन्मतारीख टाका आणि ‘जॉइन’ च्या बटणावर क्लीक करा.

जॉइन केल्यानंतरच आपण WT: Social चे सदस्य व्हाल. मात्र आपल्याला त्यात प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही गोष्टीवर प्रवेश करण्यासाठी युजरला दोन पर्याय दिले गेले आहेत, प्रथम इन्वाइट व दुसरे सबस्क्रिप्शन शुल्क देऊन.

इन्व्हिटेशन पाठवून मिळेल लवकर ऍक्सेस –

वेबसाइटवर लवकर प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यास मित्राला किंवा कुटूंबाला इन्व्हिटेशन पाठवावे लागेल. इन्व्हिटेशन पाठविण्यासाठी एक कोड देण्यात आला आहे, जो आपण कॉपी करुन आपल्यास हवा त्यास पाठवू शकता. लवकर अ‍ॅक्सेससाठी प्रतीक्षा यादी आहे, जी सध्या 1 लाख 33 हजार 987 (133987) आहे. म्हणजे, तुमचा नंबर एवढ्या लोकांनंतरच येईल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like