‘लॉकडाऊन’मध्ये अर्जुन कपूर करतोय डेटवर जाण्याची तयारी, कारण ऐकून मलायकाही खुश होईल

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेता अर्जुन कपूर सध्या इतर कोणासोबत डेटवर जाण्याचा प्लॅन करत आहे. परंतु ज्या कारणानं तो इतर कोणाला डेट करणार आहे ते ऐकून मलायका अरोराही खुश होईल आणि त्याला सलाम करेल. अर्जुन कपूर डेली वेज वर्कर्सच्या मदतीसाठी एका कार्यक्रमाअंतर्गत काही लोकांसोबत व्हर्युअल डेटींग करणार आहे.

सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प झालं आहे. या सगळ्यात सर्वाधिक त्रास कोणाला होत असेल तर तो म्हणजे डेली वेज वर्कर्सला. कारण त्यांचं उत्पन्न पूर्णपणे बंद झालं आहे. अर्जुननं डेली वेज वर्कर्सच्या मदतीसाठी अनोखा अंदाज वापरला आहे. अर्जुननं स्वत:च याबाबत सोशलवरून माहिती दिली आहे.

https://www.instagram.com/p/Bvjg-_KFXf6/

अर्जुन त्याची बहिण अंशुलाची एनजीओ फॅन काईंडच्या द्वारे डोनेशन जमवत आहे. अर्जुन सांगतो की, एक वर्ग असा आहे ज्यांचं उत्पन्न बंद झालं आहे. ते आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी झुंज देत आहेत. यात चॅट वाले भैय्या, कंस्ट्रक्शन वर्कर्स, कुली, धोबी, रिक्षा चालक असे लोक आहेत. फॅन काईंड, गिव इंडिया अशा डेल वेज वर्क्सला रोख रक्कम देऊन त्यांची मदत करतं.

गिव इंडियानं देशभरातील 60 हजारांहून अधिक कुटुंबांची ओळख पटवली आहे ज्यांना मदतीची खूप गरज आहे. आपल्या पोस्टमध्ये अर्जुननं एक लिंक दिली आहे. ज्यावर जाऊन तुम्ही डोनेट करू शकता. हा सर्व पैसा त्या गरीबांना दिला जाणार आहे.

https://www.instagram.com/p/B9PjfrHBLUC/

यानंतर थँक्स गिविंगसाठी 5 लकी विनरची निवड केली जाणार आहे ज्यांच्यासोबत अर्जुन व्हर्चुअल डेट करणार आहे. अर्जुन निवडलेल्या लोकांची व्हिडीओ लिंक शेअर करेल आणि त्यांच्यासोबत आपल्या घरात बसून डिनर करेल आणि गप्पाही मारेल. यासाठी 11 एप्रिल 2020 निश्चित करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B2ttgCmnzse/