Arjun Khotkar On Ajit Pawar NCP Alliance With BJP | राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा निर्णय भाजपाचा, शिंदे गटाचा काही संबंध नाही; अर्जुन खोतकर म्हणाले…

बुलढाणा : Arjun Khotkar On Ajit Pawar NCP Alliance With BJP | शिंदे गटाचे बुलढाणा जिल्हा पक्ष निरीक्षक आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेण्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. खोतकर यांनी म्हटले की, अनैसर्गिक महाआघाडीतून बाहेर पडून शिंदे गटाने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपासोबत युती केली. भाजपाने गरज म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. पण शिंदे गटाचा त्याच्याशी संबंध नाही. (Arjun Khotkar On Ajit Pawar NCP Alliance With BJP)

बुलढाण्यातील लोणार बाजार समितीमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. खोतकर म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा, शाखा तेथे फलक अभियान राबवा.

लोकसभा व विधानसभा एकत्रित

आगामी निवडणुकांबाबत खोतकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. दीर्घकाळ रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका लवकरच होतील.

यावेळी आमदार संजय रायमुलकर, जालना संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, भगवान सुलताने, संतोष मापारी, अंजली गवळी, शिवकुमार तेजनकर, भगवान कोकाटे, जगाराव आडे, प्रकाश पोफळे, विजय सानप, कारभारी सानप, इम्रान खान पठाण, डॉ. हेमराज लाहोटी, शालिक डव्हळे, संतोष आघाव, विश्वंभर दराडे उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Ajit Pawar | पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार

Chhagan Bhujbal On Telgi Scam | तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य, शरद पवारांच्या ‘त्या’ कृतीवर व्यक्त केली नाराजी

Elon Musk-Nicole Shanahan-Sergey Brin | एलन मस्कसोबत गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीचे प्रेमसंबंध! घेतला घटस्फोट

Pune Police MCOCA Action | कोंढवा-उंड्री परिसरातील ओंकार कापरेसह 10 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 62 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA