…म्हणून परिणीतिच्या मोबाइलमध्ये अर्जुनचे फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन कपूर आणि परिणीति चोपड़ा यांनी अनेक चित्रपटामध्ये सोबत काम केले आहे. त्या दोघांनी आपल्या करियर ची सुरवात सुद्धा सोबत केली होती. त्या दोघांनी ‘इश्कजादे’ ‘नमस्ते इंग्लैंड’ या चित्रपटात काम केलं आहे आणि आता दोघे लवकरच ‘पिंकी फरार’ चित्रपटात दिसून येणार आहे. ते दोघे खूप छान मित्र देखील आहेत. हे स्वत: परिणीतिने सांगितली आहे. एका मुलाखतीत परिणीति म्हणाली की बॉलीवूड मध्ये एक मित्र सापडणं खूप अवघड काम आहे पण अर्जुन कपूर हा खूप चांगला मित्र आहे.

त्याचबरोबर परिणीतिने अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल दिलखुलास सांगितले आहे. परिणीती म्हणते की तिच्या आणि अर्जुन यांच्यातील मैत्रीत द्वेष-राग आहे. अर्जुन सोबत ऑफ-स्क्रीन कॅमेरामध्ये बोलत असताना परिणीती म्हणली की माझा फोटो काढण्यासाठी मी माझा मोबाइल अर्जुनला देत असते. पण मी जेंव्हा गॅलरी उघडते तेंव्हा ५० पेक्षा जास्त फोटो असतात अर्जुनचे. त्यानंतर परिणीतीला विचारले गेले कि मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा लग्नाबद्दल ज्या अफवा पसरत होत्या त्याबद्दल तुला काही माहिती आहे का? त्यावर ती म्हणली मला नाही माहित ते लग्न करणार आहेत की नाही.