शस्त्र बाळगणार्‍या दोघांना अटक, 2 कोयते जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – मध्यभागात शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोयते तसेच हॉकी स्टीक जप्त करण्यात आली. अभिषेक मनोज घारमळकर (वय २३,रा. बुधवार पेठ), राजेश नरसप्पा धनगर (वय २०,रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

घारमळकर व धनगर यांचा बुधवार पेठेतील क्रांती हॉटेलजवळ काहीजणांशी वाद झाला होता. दरम्यान दोघेजण गणेश पेठ परिसरात थांबले असून त्यांनी पोत्यात गुंडाळून दोन कोयते आणि हॉकी स्टीक आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल पवार आणि वैभव स्वामी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, अजय थोरात, तुषार खडके, सुभाष पिंगळे यांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी कोयते बाळगल्याची कबुली दिली आहे.

Visit : Policenama.com