वायसीएम हॉस्पीटलमधून दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या गुंडास्कॉड उत्तर विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख दहा हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पिंपरी येथील शगुन चौकात आज (गुरुवार) करण्यात आली.
[amazon_link asins=’B07DYFX2C8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’788e0762-9be5-11e8-98a4-6ffc211b4771′]

गुंडास्कॉडचे पथक आज पिंपरी भागात गस्त घालत असताना पथकातील पोलीस शिपाई दत्ता फुलसुंदर यांना एक अल्पवयीन मुलगा सुझुकी अॅक्सेस मोपेड विक्री करण्यासाठी शगुन चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शगुन चौकात सापळा रचून मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुझुकी अॅक्सेस मोपेड वायसीएम रुग्णालयातून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १ अॅक्सीस, १ टिव्हीएस वेगो, १ होंडा पॅशन, २ यामाहा एफझेड, १ हिरो होंडा स्प्लेंडर अशा एकूण सहा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी पिंपरी, पुणे कॅम्प, शिवाजीनगर भागातून चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ भानुप्रताप बर्गे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस फौजदार नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, शितल शिंदे, रमेश भिसे, प्रदिप शेलार, दत्ता फुलसुंदर, अतुल मेंगे, नवनाथ चांदणे, कांतिलाल बनसोडे यांच्या पथकाने केली.