Pune : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे तीव्र आंदोलन

आसखेड : पोलीसनामा ऑनलाइन –   संतप्त आंदोलकांना भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पाडले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना धडपकड केली आणि पुन्हा काम सुरु केले. अटक करा अन्यथा गोळ्या घाला, पण काम बंद करा. त्यानंतर चर्चा करा, अशा आशयाचा घोषणा देत आंदोलकांना भामा-आसखेडचे काम बंद पाडले.

पॅकेज नाकारल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आंदोलकांनी जल भरो आंदोलन करत काम बंद पाडण्याचा वित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काम पुन्हा सुरू केले. धामणेफाटा, करंजवविहिरे येथे पोलिसांनी नाकाबंदी करून आंदोलकांना थोपवून धरले. अशात आंदोलकांना एक गट पोलिसांना चुकवून कामाच्या ठिकाणी पोहोचला आणि काम बंद पाडले. परंतु, दुसऱ्या गटाला थोफविण्यात पोलिसांना यश आले आणि आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू केले.

कोर्टाकडून आदेश मिळूनही जमिनीच्या बदल्यात जमिनी दिल्या नाहीत, पुनर्वसनही केले नाही, 65 टक्के रक्कम भरणाऱ्यांनाही जमिनी मिळालेल्या नाहीत. पोलीस प्रशासन आणि शासनाला सहकार्य करूनही आमची फसवणूक केली जात आहे. काम बंद झाल्यावरच आम्ही चर्चा करू, असे मत सत्यवान नवले यांनी मांडले. आंदोलन चिरडण्याचा डाव ओळखून पोलिसांना ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी पोलिस व्हॅनमधून उड्या मारल्या. त्यामध्ये वयोवृद्ध शेतकरी गबाजी सातपुते गंभीर जखमी झाले. करंजविहिरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.